Dharmendra भडकले जावेद अख्तरांवर, 50 वर्षांपूर्वीच्या 'जंजीर' सिनेमावरनं रंगला वाद

बॉलीवूडमधील वादांपासून धर्मेंद्र नेहमीच लांब राहतात, पण जावेद अख्तरांनी अमिताभच्या 'जंजीर' वरनं आपल्या विरोधात केलेलं विधान धर्मेंद्र यांना पटलेलं नाही.
Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says..
Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says.. Google
Updated on

Dharmendra: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र नेहमी कोणत्याही वादापासून लांब राहतात. पण यावेळी मात्र ते भडकलेले दिसतायत ते जावेद अख्तरांवर. धर्मेंद्र यांनी जावेद अख्तर यांच्या एका विधानावर तगडा पलटवार केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी जावेद अख्तर यांनी एका ताज्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, जंजीर सिनेमा आधी धर्मेंद्र यांना ऑफर झाला होता. पण धर्मेंद्र यांनी सिनेमाला रिजेक्ट केलं होतं.

१९७३ साली रिलीज झालेल्या या ब्लॉकबस्टर सिनेमानं अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीचा 'अॅंग्री यंग मॅन' बनवून टाकलं. या सिनेमाची कथा सलीम खान आणि जावेद अख्तर यांची होती. आता धर्मेंद्र यांनी जावेद अख्तर यांच्या या विधानावर वक्तव्य करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.(Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says..)

Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says..
Big Boss 16: 'मार-मारकर मोर बना दूंगी', सौंदर्याचा बुचडाच धरायचा बाकी होती अर्चना

धर्मेंद्र यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे की,''जावेद कसा आहेस...या जगात सत्य नेहमीच दाबलं जातं.. तुला आशीर्वाद माझे. तुला मनाला स्पर्श करणारं असं छान लिहिता येत, पण तसंच चांगलं बोलायची जादू शिकला असतास तर चांगलं झालं असतं''. धर्मेंद्र यांनी एकापाठोपाठ एक असे ट्वीट केले आहेत. आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे,''जंजीरला नकार देणं हा एक भावूक मुद्दा होता, ज्या संदर्भात मी स्पष्टीकरण याआधी दिलं आहे. त्यामुळे मला चुकीचं समजू नकोस. मला जावेद आणि अमित दोघांविषयीही तितकाच लळा आहे''.

Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says..
Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says..Twitter Image

धर्मेंद्र यांच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी मात्र जावेद अख्तरांना फैलावर घेतलं आहे. काही जणांचे म्हणणे आहे की जावेद अख्तर केवळ चर्चेत राहण्यासाठी वादाचे मुद्दे उकरून काढतात.

Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says..
KBC14: चूक भोवली... नाहीतर सिझनचा पहिला विजेता बनला असता शाश्वत गोयल, काय घडलं नेमकं?

त्याचं झालं असं की जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की,''जंजीरचं स्क्रीप्ट हे धर्मेंद्रसाठी लिहिलं गेलं होतं. अमिताभ बच्चन यांना खूप शेवटी पसंती देण्यात आली. कारण धर्मेंद्र यांनी नंतर सिनेमा करण्यास नकार कळवला. धर्मेंद्र यांनी जंजीरला नकार दिल्यानंतर प्रकाश मेहरांनी खूप अभिनेत्यांना विचारणा केली पण सगळीकडनं नकार आल्यानंतर 'जंजीर' अमिताभकडे गेला'', हा देखील खुलासा अख्तरांनी केला.

Dharmendra hits back javed akhtar claim that he refused to do zanjeer says..
कियाराशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थचा जुन्या ब्रेकअप संदर्भात मोठा खुलासा; म्हणाला,'आता कधीच..'

जावेद अख्तर पुढे मुलाखतीत असं देखील म्हणाले की,''मला जंजीरला नकार देण्याचं धर्मेंद्र यांचे कारण पटतेय. तो एक काळ होता जेव्हा राजेश खन्नाला लोक सिनेमाचा देव समजून त्याची पूजा करायचे. सिनेमात संगीत गरजेचं असायचं आणि जंजीरमध्ये कोणताच रोमॅंटिक अॅंगल नव्हता. ना हिरो कुठे गाताना दिसणार होता. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत हिरोला गंभीर चेहऱ्यानं आणि अॅटिट्युडमध्ये रहावं लागणार होतं. आणि त्या काळात जंजीर सारखा सिनेमा त्याआधी बनलाच नव्हता. आणि धर्मेंद यांचा नकार त्यामुळे सहज होता''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com