Big Boss 16: 'मार-मारकर मोर बना दूंगी', सौंदर्याचा बुचडाच धरायचा बाकी होती अर्चना Archana Gautam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 16 fight between archana gautam and saoundrya over food kitchen

Big Boss 16: 'मार-मारकर मोर बना दूंगी', सौंदर्याचा बुचडाच धरायचा बाकी होती अर्चना

Big Boss 16- सध्या बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप पडलेले दिसत आहेत.अर्थात आता हा गेम शो सुरु होऊन दहा-बारा दिवस होत आहेत तर हे होणं स्वाभाविक होतं. यामध्ये छोट्या पडद्यावरचे कलाकार एका ग्रुपमध्ये आहेत तर दुसऱ्या ग्रुपमध्ये नॉन-टीव्ही सेलिब्रिटी आहेत. शो सुरु होऊन काहीच दिवस होत आहेत तोवर दुसऱ्याच आठवड्यात आता जोरदार वाद रंगलेला दिसला. घरातील सदस्यांमध्ये किराणा मालाचं विभाजन आणि खाण्यावरनं वाद होताना दिसत आहेत. (Big Boss 16 fight between archana gautam and saoundrya over food kitchen)

हेही वाचा: KBC14: चूक भोवली... नाहीतर सिझनचा पहिला विजेता बनला असता शाश्वत गोयल, काय घडलं नेमकं?

शो च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात अर्चना गौतमचं सौंदर्या शर्मा आणि टीना दत्तासोबत जोरदार भांडण झालेलं दिसलं. त्याचं झालं असं की,सौंदर्या डायनिंग एरियात शालीनसोबत बसून डिनर करत होती. अर्चना देखील तिथेच बसून जेवत होती. तेव्हा शालीन सौंदर्याशी बोलता बोलता सांगतो की त्यानं अर्चनाला मारलं नव्हतं. आणि शालीनचं हे बोलणं ऐकून अर्चना त्याला कडक शब्दात उत्तर देते की यापुढे असा विचार करायची देखील हिम्मत करू नकोस. तेव्हा सौदर्यां अर्चनावर रागावते. आणि मग काय अर्चनाच ती, सौंदर्याला तितक्याच तीव्र भाषेत उत्तर देते. आणि मग पाहता-पाहता दोघींमध्ये युद्धाला सुरुवात होते, अर्थात कडाक्याचं भांडण जुंपतं.

हेही वाचा: Tarak Mehta: 'तारक मेहता' फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर, दयाबेनच्या आवाजानं केला घात

सौंदर्या अर्चनाच्या स्टॅंडर्डविषयी बोलते,जे अर्चनाला खटकतं. अर्चना रागात सौंदर्याला म्हणते, ''तुला मारुन-मारुन मोर बनवीन''. अर्चना एकदाच नाही तर अनेकदा हा डायलॉग बोलून दाखवते. भांडणानंतर सौंदर्या बेडरुममध्ये जाऊन जोर-जोरात रडू लागते. आणि म्हणते की, ''मी एका चांगल्या कुटुंबातून आलेली मुलगी आहे. त्यामुळे हे असं घाणेरडं वागणं,बोलणं मी सहन नाही करू शकत''.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: 'ए किरण माने, तुला..,' अपुर्वा नेमळेकरची जीभ घसरली...

यानंतर पुढल्या दिवशी टीना दत्ता आणि सौंदर्या किचनमध्ये जेवण बनवत असतात,तेव्हा अर्चना किचनमध्ये जाऊन तिला चहा बनवायचा आहे असं सांगते. तेव्हा टीना आणि सौंदर्या म्हणतात की त्या जेवण बनवत आहेत. त्यामुळे दुसरं काही आता बनवता येणार नाही. यावरनं अर्चनाचं पुन्हा टीना आणि सौंदर्यासोबत जोरदार वाद होतो. टीना आणि सौंदर्या रागात किचनमधून निघून जातात आणि म्हणतात की,जर अर्चना किचनमध्ये असेल तर त्या जेवण नाही बनवणार.

हेही वाचा: Big Boss 16: स्पर्धकांचे धाबे दणाणले; आता 'सॉरी' बोलल्यावरही मिळतेय कठोर शिक्षा

दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घराचं वातावरण जरा जास्तच बिघडत चाललेलं दिसत आहे. सदस्यांमध्ये आता मैत्री नाही तर कट्टर दुश्मनी दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी सदस्यांचा एक वेगळाच रंग समोर येत आहे. जेवण आणि किराणा माल हा बिग बॉसच्या घरात सध्या मोठा मुद्दा बनत चालला आहे. जास्त वाद हे जेवणावरनंच होत असल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा: Big Boss 16: 'हा तर गरिबांचा हृतिक..',गौतमला सुनावताना रॅपरच्या भडकलेल्या चाहत्यांची घसरली जीभ

सदस्य भांडणात आपली मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना कुटुंबाला देखील मध्ये ओढताना दिसत आहेत. यावर बिग बॉसनं कॅप्टन गौतमला कन्फेशन रुममध्ये बोलावून घरातील सदस्यांनी जात,धर्म यावरनं भेदभाव केलेलं खपवून घेतलं जाणार नाही अशी तंबीही दिली. आता यानंतर घरातील सदस्यांमध्ये काय बदल होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.