कियाराशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थचा जुन्या ब्रेकअप संदर्भात मोठा खुलासा; म्हणाला,'आता कधीच..'

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं आपलं जुनं ब्रेकअप म्हणजे आलिया भट्टविषयीच भाष्य केल्याचा अंदाज आता नेटकरी लावत आहेत.
Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advaniInstagram
Updated on

Sidharth Malhotra: बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या आणि कियाराच्या लग्नाविषयी सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. बोललं जात आहे की,तो कियारासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तर दुसरीकडे त्याची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्ट सध्या आई होणार असल्यानं तिच्याविषयी नेहमीच नवनवीन बातम्या कानावर पडत असतात. सिद्धार्थने मागे एका मुलाखतीत म्हटलं होतं की,''मी माझ्या जुन्या ब्रेकअपवरनं हे शिकलोय की कधी पाळीव प्राणी गिफ्ट म्हणून गर्लफ्रेंडला द्यायला नकोत.'' (Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani)

Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
KBC14: चूक भोवली... नाहीतर सिझनचा पहिला विजेता बनला असता शाश्वत गोयल, काय घडलं नेमकं?

मागे तो करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ७' या चॅट शो मध्ये गेला असताना म्हणाला होता की, तो त्याच्या एक्सच्या मांजरीला खूप मिस करतो. आता हे जगजाहीर आहे की आलियाजवळ एक मांजर आहे,जिचं नाव एडवर्ड आहे. असं असताना जेव्हा सिद्धार्थ सारखं एक्ससोबत तिच्या मांजरीचा उल्लेख करेल तर काही लपून राहणार आहे का. यावरनं स्पष्ट कळत आहे की त्यानं आलियाला डेट केलं होतं.

Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
Big Boss 16: 'मार-मारकर मोर बना दूंगी', सौंदर्याचा बुचडाच धरायचा बाकी होती अर्चना

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या सिनेमात वरुण धवन देखील होता. काही रिपोर्ट्समधून दावा केला जात आहे की,दोघांनी त्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच एकमेकांना डेट करायला सुरु केलं होतं. दोघंही 'कपूर अॅन्ड सन्स' सिनेमापर्यंत रिलेशनशीपमध्ये होते. हा त्यांचा एकत्र असा दुसरा सिनेमा होता.

Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
Tarak Mehta: 'तारक मेहता' फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर, दयाबेनच्या आवाजानं केला घात

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा जेव्हा करणच्या 'कॉफी विथ करण' चॅट शो मध्ये गेला होता तेव्हा त्याला करणनं प्रश्न विचारला होता की,'तो त्याच्या एक्सच्या कोणत्या गोष्टीला मिस करतो?' तेव्हा सिद्धार्थने,''तिची मांजर'' असं उत्तर दिलं होतं. आणि आता काही दिवसांपूर्वी त्यानं आलिया भट्टच्या एडवर्ड नावाच्या मांजरीचा देखील एका मुलाखतीत पुन्हा उल्लेख केला.

Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
Big Boss Marathi 4: 'ए किरण माने, तुला..,' अपुर्वा नेमळेकरची जीभ घसरली...

सिद्धार्थला त्या मुलाखतीतील रॅपीड फायर राऊंडमध्ये जेव्हा विचारण्यात आले की,'तो त्याच्या आधीच्या ब्रेकअप पासून काय शिकलाय?', तेव्हा तो म्हणाला,''मला वाटतं मी माझ्या आधीच्या रिलेशनशीपमधून शिकलोय की, पाळीव प्राणी गिफ्टमध्ये देऊ नका''. तर दुसरा प्रश्न होता की,'अशी कोणती गोष्ट आलियाची आहे,जी तुला चोरायला आवडेल?'

Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
Big Boss Marathi 4: कोण आहे घरातला 'तो' सदस्य ज्याला स्वच्छतेवरनं केलं जातंय टार्गेट...

तेव्हा तो पटकन म्हणाला,''द कॅट-एडवर्ड''. ही मुलाखत पाहिल्यानंतर त्याचे चाहते आता अंदाज लावत आहेत की,सिद्धार्थनेच ही एडवर्ड मांजर आलियाला गिफ्ट म्हणून दिली आहे. एक नेटकरी म्हणाला आहे,'अच्छा,तर एडवर्ड आलियाला सिद्धार्थने गिफ्टमध्ये दिली होती. त्यात सिद्धार्थ म्हणाला देखील आहे तो मांजरीला मिस करतोय, आता सगळंच स्पष्ट होत आहे'. तर दुसऱ्या एकानं थेट सिद्धार्थला प्रश्न विचारला आहे की,'सिद्धार्थला असं म्हणायचं आहे का की त्यानेच आलियाला एडवर्ड गिफ्ट केलीय?'

Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
Amitabh Secret: 'या' दोन रंगांचे कपडे रीजेक्ट करतात अमिताभ, खुलासा करत डिझाईनरनं सांगितलं कारण...

सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांना डेट करत होते तेव्हा त्यांनी कधीच आपल्या नात्यावर बोलणं पसंत केलं नाही. २०१९ मध्ये जेव्हा सिद्धार्थ 'कॉफी विथ करण' या शो मध्ये गेला होता,तेव्हा त्याला करणने विचारले होते की, 'ब्रेकअपनंतर आलियासोबत त्याचे नाते कसे आहे?', त्यावर तो म्हणाला,''मला नाही वाटत अजूनही तो कडूपणा बाकी आहे कारण त्यानंतर आम्ही अजून भेटलोच नाही. हे खूप सहज होतं. आणि आता खूप वेळ निघून गेलाय. मी तिला डेट करण्या आधीपासून ओळखत होतो. मी स्टुडंट ऑफ द इयर सिनेमात तिच्यासोबत पहिला शॉट दिला. आमचा खूप मोठा इतिहास आहे''.

Sidharth Malhotra on last relationship, soon to marry kiara advani
Amitabh Property: अमिताभचं मृत्यूपत्र, करोडोंची संपत्ती,घर,नेट वर्थ... जाणून घ्या याविषयी

आलिया भट्ट आता मिसेस रणबीर कपूर झाली आहे, दोघांनी लग्नाआधी ५ वर्ष एकमेकांना डेट केलं. आलिया सध्या आपली प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही पार पडला. ज्या कार्यक्रमात कपूर आणि भट्ट असे दोन्हीकडचे कुटुंबिय उपस्थित होते. सिद्धार्थ सध्या कियारा अडवाणीला डेट करतोय. दोघं अनेकदा एकत्र दिसतात. आता तर बातमी कानावर पडतेय की काही महिन्यातच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com