
आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर झळकले ‘धर्मवीर’
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न (Marathi Movie) सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारत असून त्यांचा पहिला लुकसमोर आल्यापासून चित्रपटाबाबतअधिकच उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.
हेही वाचा: सलामान खान आणि आनंद दिघे यांच्यात समान आहेत या तीन गोष्टी..
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच पण आता चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात नवी भर पडली आहे. अशी गोष्ट जी आजवर मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धी किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती. मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे १६८०० स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतू आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत असून या भागातून जाणा-या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे.
हेही वाचा: आनंद दिघे होते म्हणून आज एकनाथ शिंदे आहेत.. ही घटना माहितीये का?
झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला आणि प्रविण तरडे (pravin tarde) यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Dharmveer Movie Poster On Asias Biggest Hoarding In Bandra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..