esakal | अभिनेता दिलीप ताहील यांच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक
sakal

बोलून बातमी शोधा

 dhurv tahil son of actor dillip tahil arrest in drugs case

अभिनेता दिलीप ताहील यांच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक

sakal_logo
By
अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा

मुंबई ; मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाकडून (mumbai narcotics department) अभिनेता दिलीप ताहील (dilip tahil) यांचा मुलगा ध्रुव ताहील याला ड्रग्स प्रकरणात (drugs case) अटक केली आहे. ड्रग्स विक्रेत्या च्या संपर्कात असल्याचे व्हाट्सअप चॅट वरून स्पष्ट झाले आहे.

एका ड्रग्स पेडलर्सच्या अटकेनंतर एएनसीची मोठी कारवाई केली. ध्रुव ताहील एका पेडलर्सच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून वारंवार ड्रग्सची मागणी करत होता त्या बदल्यात त्याने त्याला पैसे दिल्याच उघड झाले आहे.

हेही वाचा: सलमान म्हणतो, 'जिंदगी जी है अपनी शर्तो पे, जीना कुँवारा नही मांगता'

हेही वाचा: जॅकलिनची लाखमोलाची मदत; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

त्याचा मोबाईल एएनसीने ताब्यात घेतला असता त्याच्या व्हाट्सपवर ध्रुव ताहील यांच्यासोबतचे संभाषण एएनसीच्या हाती लागले ज्यात तो वारंवार ड्रग्सची मागणी करत होता. ध्रुव याने ड्रग्ससाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले होते अस तपासात स्पष्ट झालं त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली आहे. 2019 ते मार्च 2019 पर्यंत या तस्कराच्या संपर्कात होता.