esakal | दिया मिर्झा झाली आई, लग्नाच्या तीन महिन्यानंतर बाळाला दिला जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

diya mirza

दिया मिर्झा झाली आई, लग्नाच्या तीन महिन्यानंतर बाळाला दिला जन्म

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: गर्भवती असलेली अभिनेत्री दिया मिर्झाने बाळाला जन्म दिल्याची आनंदाची बातमी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीच १४ मे रोजी दियाची प्रसुती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दियाने सोशल मीडियावरुन मुलाला जन्म दिल्याची आनंदाची बातमी दिली आहे. संपूर्ण प्रवासात साथ दिल्याबद्दल दियाने हितचिंतकांचे आभार मानले आहेत. दिया आणि वैभवने मुलाचे नाव अव्यान ठेवले आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दियाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमॅन वैभव रेखी बरोबर विवाह केला. (Dia Mirza and Vaibhav Rekhi welcome baby boy name him Avyaan dmp 82)

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दियाने ही बातमी दिली. मुलाने हात पकडल्याचा फोटो दियाने शेअर केला आहे. नऊ महिने पूर्ण होण्याधीच अव्यानचा जन्म झाला आहे. लहान मुलांच्या ICU वॉर्डमध्ये डॉक्टर आणि नर्सने अव्यानची विशेष काळजी घेतल्याची माहिती दियाने दिली.

हेही वाचा: इंग्लंडची 'विम्बल्डन फायनल' अन् मुंबई हायकोर्ट.. वाचा रंजक किस्सा

"अव्यान लवकरच घरी येईल. त्याची मोठी बहिण समायरा आणि त्याचे आजी-आजोबा त्याला उचलून घेण्यासाठी खूप आतूर आहेत. आमचे हितचिंतक आणि चाहत्यांना मी एवढच सांगू इच्छिते की, तुम्ही आमची इतकी काळजी करता, ते आमच्यासाठी खूप आहे. तुमचं प्रेम, विश्वास आणि प्रार्थनांसाठी मी तुमची आभारी आहे"

हेही वाचा: पाकची नापाक हरकत, BSF कडून गोळ्यांचा वर्षाव सुरु होताचं ड्रोन फिरलं माघारी

दिया मिर्झा खासकरुन 'रेहना हे तेरे दिले में' या चित्रपटासाठी ओळखली जाते. तिने काही चित्रपटात कामं केली आहेत. पण तिला स्वत:ला वेगळं स्थान निर्माण करता आलं नाही. वेगवेगळ्या सामाजिक पोस्टमुळे दिया मिर्झा नेहमीच चर्चेत असते.

loading image