Dia Mirza: अव्यान घेतोय निसर्गाचे धडे....

Dia Mirza
Dia MirzaInstagram

अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) नेहमीच पर्यावरणीय समस्यांचे समर्थन करत असते. आता तिचा मुलगा 'अव्यान' मोठा होत असताना, नैसर्गिक जगाशी ओळख करून देण्यासाठी अभिनेत्री विशेष प्रयत्न करत आहे. दियाने मुलासोबत निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या वेळेचे काही मनमोहक फोटो शेअर केले. तिच्या Instagram हँडलवर दीयाने लिहिले, "शेवटी, आम्ही फक्त आम्हाला जे आवडते तेच जतन करू; आम्हाला जे समजते त्याच्यावरच आम्ही प्रेम करू आणि आम्हाला जे शिकवले जाते तेच आम्ही समजू." फोटोंमध्ये, दिया तिचा मुलगा अव्यानला तिच्या जवळ असलेल्या बाळाच्या कॅरियरमध्ये घेताना दिसत आहे आणि त्याला फुले आणि हिरवी झुडपे दाखवत आहे. अभिनेत्री निसर्गरम्य वातावरणात तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना आनंदी दिसत होती.

अलीकडेच मातृत्वाविषयी बोलताना, अभिनेत्रीने सांगितले होते की, “हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि समाधान देणारा काळ आहे आणि मी त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. मी दररोज मातृत्वातील आनंद आणि आव्हानांबद्दल शिकत आहे, माझ्या व्यग्र दिवसात स्वतःसाठी थोडा मोकळा वेळ आणि काम करण्यासाठी थोडा वेळ शोधत आहेत. त्यामध्ये माझे बाळ आणि आमची मुलगी समायरा (Samaira Rekhi) माझ्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी राहतील याची खात्री करून घेत आहे. वैभवसोबत (Vaibhav Rekhi) माझे जीवन शेअर करणे हा देखील एक आशीर्वाद आहे कारण तो एक मजबूत सपोर्ट सिस्टीम आणि एक हाताशी असलेला पिता आहे. मुले खरोखरच प्रौढांसाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक असतात कारण ते निरागसपणे जगाकडे बघत असतात. अव्यानने (Avyaan Mirza Rekhi), माझा मुलगा, मला सजगता, आनंदी राहणे शिकवले आहे. त्याची फक्त एक स्माईल माझ्या सर्व काळजी दूर करू शकते. मला आता एक अधिक जबाबदार व्यक्ती सारखे वाटत आहे कारण मला माझ्या कामाच्या जोरावर त्याच्यासाठी एक चांगले जग निर्माण करायचे आहे.”

Dia Mirza
'ये हसीं वादियां,ये खुला आसमां' हनिमूनला गेलेल्या मौनीचा रोमॅंटिक मूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com