'आलिया_ MY_ Foot', ट्वीटरवर का होतंय ट्रेन्ड, समोर आलं नवीन कारण...

सोशल मीडियावर आलिया संदर्भात एका न्यूज पोर्टलवरनं बातमी शेअर केल्यानंतर लोकांनी आलिया-रणबीर दोघांवर निशाणा साधला आहे.
did alia bhatt and ranbir kapoor donated  crores to pakistani flood relief fund? Fact Check
did alia bhatt and ranbir kapoor donated crores to pakistani flood relief fund? Fact CheckGoogle

Boycott Brahmastara And Alia Bhatt-Ranbir Kapoor: सध्या बॉलीवूडची अवस्था बॉयकॉट गॅंगने सळो की पळो करुन सोडली आहे. आता या बॉयकॉट गॅंगची नजर आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमावर. जसा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तसं लागलीच ट्रोलर्सनी या सिनेमावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. बरं हा निशाणा साधण्याचं एक नाही तर अनेक कारणं समोर येत आहेत. सध्या ट्वीटरवर #आलिया_My_Foot ट्रेंड होताना दिसत आहे. (did alia bhatt and ranbir kapoor donated crores to pakistani flood relief fund? Fact Check)

did alia bhatt and ranbir kapoor donated  crores to pakistani flood relief fund? Fact Check
सिद्धार्थ ते श्रीदेवी...निधनानंतर यांच्या प्रॉपर्टीचं काय झालं?

त्याचं झालं असं की सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होताना दिसत आहे,ज्यामध्ये सांगितलं जात आहे की आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने पाकिस्तानी पुरग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. याच बातमीला ऐकल्यावर 'ब्रह्मास्त्र' बॉयकॉट करणाऱ्यांचा पारा आणखीनच चढला आहे. आता सत्य हे नाही जे ऐकून लोक आलियावर नाराज झालेत,तर ते कारण काही वेगळंच आहे.

थोडक्यात इथे सांगतो की,ट्वीटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे,ज्यामध्ये सांगितलं जात आहे की पाकिस्तान पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने मदतीचा हात पुढे केला आहे. ट्वीटरवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,''पाकिस्तानमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूड पुढे सरसावलं,ब्रह्मास्त्र सिनेमाचे निर्माते करण जोहर ने ५ करोड,आलिया-रणबीरने प्रत्येकी १ करोड अशी मदत केली आहे''. या पोस्टमध्ये हे देखील सांगितलं आहे की,रणबीर-आलियानं ब्रह्मास्त्र हीट झाल्यावर पाकिस्तानी पुरग्रस्तांना ५१ करोड देणार असल्याचं वचन दिलंय. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की- 'बॉलीवूड नेहमी माणूसकीचा धर्म जपत आला आहे'.

आता सोशल मीडियावर या पोस्टवरनंच लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पोस्टला पाहिल्यावर लोक भलतेच चिडलेत आणि त्यांनी ट्वीटरवर #आलिया_My_Foot चा ट्रेंड सुरु केला आहे. ट्वीटरवर नेटकरी प्रतिक्रिया नोंदलत आपली नाराजगी दर्शवताना दिसत आहेत. एकानं लिहिलं आहे की-'भारतातून कमाई करतात आणि पाकिस्तानवर खर्च करतात,बॉयकॉट बॉलीवूड'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'जेव्हा भारतात पूर येतो तेव्हा कुठे असतात हे बॉलीवूडकर'. एकानं लिहिलंय,'गेल्या महिन्यात बिहार,आसाममध्ये पुरानं सगळंच उद्ध्वस्त केलं तेव्हा कुठे होते हे लोक?' दुसऱ्या एकानं लिहिलंय,'कुठे गेला होता बॉलीवूडवाल्यांचा पैसा जेव्हा भारतात कोरोनामुळे लोक मरत होते'. तर काही लोकांनी बॉयकॉट गॅंगला समजावण्याचा देखील प्रयत्न केला आहे की आलिया-रणबीर संदर्भातील बातमी खोटी आहे. पण लोक मात्र ऐकण्याच्या मनःस्थितीत मुळीच दिसत नाहीत.

थोडं या पोस्टच्या बाबतीत ज्या काही खऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत त्याविषयी सांगतो. तर आलिया-रणबीरनं पाकिस्तानी पुरग्रस्तांना सहकार्य केलं यात काहीच तथ्य नाही. ही पोस्ट कोणीतरी मुद्दामहून केली आहे. बीबीसी हिन्दी च्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं ही बातमी शेअर केली गेली होती. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बीबीसी हिंदीने स्वतः स्पष्टीकरण देत एक ट्वीट केलं आहे ज्यात रणबीर-आलिया संदर्भात केलेली पोस्ट फेक असल्याचं म्हटलं आहे.

ब्रह्मास्त्र सिनेमाच्या ट्रेलर रिलीजनंतर बॉयकॉटची मागणी होताना दिसतेय. हा सिनेमा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत बनविण्यात आलेला आहे. सिनेमाच्या रिलीजला काही महिने उरलेले असतानाच बॉयकॉट ट्रेन्ड सुरु केला गेला होता. सिनेमा हिंदू धर्माविरोधात भाष्य करतो असं म्हटलं जात असून इतरही अनेक कारणं बॉयकॉट गॅंग समोर आणत आहे. आता ९ सप्टेंबर रोजी सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात रणबीर कपूर,आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन,मौनी रॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com