'जन्म केव्हा घ्यायचा आणि मरायचं कधी हे आपण ठरवू  शकत नाही...' सुशांतचा 'दिल बेचारा'मधील डायलॉग करतोय चाहत्यांना भावूक

dil bechara
dil bechara

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'च्या ट्रेलरची सगळ्यांनाच उत्सुकता होती. या ट्रेलरचा रेकॉर्डब्रेक करण्यासाठी सुशांतच्या चाहत्यांनी सकाळपासूनंच सोशल मिडियावर एक मोहीम राबवली होती. अखेर सुशांतच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली कारण या सिनेमाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सुशांतला पाहून त्याचे चाहते त्याच्या आठवणींमुळे भावूक झाले आहेत.

सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी स्टारर 'दिल बेचारा' ही एक लव्हस्टोरी आहे. 'द फॉल्ट इन अव्हर स्टार्स' या पुस्तकावर इंग्रजी सिनेमा आधीच होऊन गेला. ६ वर्षापूर्वी हा इंग्रजी सिनेमा आला होता आणि त्याच्या दोन वर्ष आधी हे पुस्तक आलं होतं. म्हणजेच २०१२ मध्ये लॉन्च झालेल्या या पुस्तकावर जवळपास ८ वर्षांनंतर हिंदी सिनेमा आला आहे. 'जन्म केव्हा घ्यायचा आणि कधी मरायचं हे आपण ठरवू शकत नाही, पण कसं जगायचं हे मात्र आपण ठरवू शकतो' हा डायलॉग या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुशांतच्या तोंडून ऐकायला मिळतो आणि त्याचे चाहते त्याच्या आठवणींमध्ये भावूक होतात.    

या सिनेमातून संजना सांघीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हा सिनेमा अनेक वर्षांपासून रखडला होता. यावर्षी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्या कारणाने थिएटरमध्ये रिलीज होऊ शकला नाही. मात्र सुशांतच्या आत्महत्येनंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सुशांतचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुशांतच्या चाहत्यांनी त्याचा हा शेवटचा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याची मागणी देखील केली होती मात्र आता हा सिनेमा २४ जुलैला डिजीटलवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे हा सिनेमा प्रेक्षकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहे. 

या सिनेमात एका छोट्या भूमिकेत सैफ अली खान देखील दिसून येईल. या सिनेमाला ए.आर.रेहमान यांनी संगीत दिलं असून गाणी अमिताभ भट्टाचार्यची आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दिग्दर्शक मुकेश छाब्रा ही तीच व्यक्ती आहे ज्यांनी कास्टिंग डिरेक्टर म्हणून सुशांतला त्यांचा पहिला सिनेमा 'काय पो चे'मध्ये मुख्य भूमिकेसाठी कास्ट केलं होतं आणि आता शेवटचा सिनेमा देखील सुशांतने त्यांच्यासोबतंच केला होता. 

dil bechara trailer last release of late sushant singh rajput  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com