आई बनण्याआधीच दिपिका कक्कडनं घेतला मोठा निर्णय, म्हणाली,'नवऱ्याला आधीच स्पष्ट सांगितलंय..'Dipika Kakar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipika Kakar pregnancy talks about her career

Dipika Kakar: आई बनण्याआधीच दिपिका कक्कडनं घेतला मोठा निर्णय, म्हणाली,'नवऱ्याला आधीच स्पष्ट सांगितलंय..'

Dipika Kakar pregnancy : टी.व्ही अभिनेत्री दीपिका कक्कड गेल्या काही काळापासून आपल्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्याला प्रेग्नेंसी दरम्यानच्या खास क्षणांचे व्हिडीओ शेअर करताना दिसते आणि अनेकदा आईच्या नव्या भूमिकेविषयी बोलताना दिसते.

दीपिका कक्कडनं दुसरं लग्न टी.व्ही अभिनेता शोएब इब्राहिमसोबत केलं आणि दोघं आता लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकतंच दिपिका कक्कडनं प्रेग्नेंसीनंतरच्या तिच्या करिअर प्लॅनविषयी संवाद साधला आहे.(Dipika Kakar pregnancy talks about her career Movies serial marraige shoaib ibrahim)

'ससुराल सिमर का..' सारख्या प्रसिद्ध मालिकांमधून स्वतःची ओळख बनवणारी दिपिका कक्कड आपल्या वैयक्तिक आयुष्यात आता खूपच व्यस्त झाली आहे. २०१८ साली दिपिकानं शोएब इब्राहिमसोबत लग्न केलं होतं. आता लवकरच ती आई बनणार आहे आणि त्या दरम्यान तिनं आपल्या भविष्यातील प्लॅनिंगविषयी खुलासा केला आहे.

अभिनेत्रीनं सांगितलं की-''मी प्रेग्नेंसीच्या या काळाला खूप एन्जॉय करत आहे आणि मी माझ्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे माझा उत्साह वेगळाच आहे. मी खूप कमी वयात काम करायला सुरुवात केली होती आणि जवळपास १० ते १५ वर्ष मी काम केलं''.

''जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मी माझा पती शोएब इब्राहिमला सांगितलं होतं की मला आता काम करायचं नाही आणि अभिनय क्षेत्राला मला सोडायचं आहे. मी एक आई आणि हाऊस वाईफ म्हणून राहू इच्छिते''.

कदाचित दिपिकाचा हा निर्णय तिच्या चाहत्यांना फारसा रुचणार नाही पण अभिनेत्रीनं तिच्याकडून एकदम स्पष्ट मत व्यक्त केलं आहे की ती आता भविष्यात अभिनय करताना दिसणार नाही.

अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमी अपडेट शेअर करताना दिसते. वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर लग्न केल्यापासून दीपिका कक्कडनं जास्त काम केलेलं नाही. ती फक्त 'कहां हम कहां तुम' नावाच्या मालिकेत दिसली आहे.