Priyanka Chopra: 'प्लीज,हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे..', 'ऐतराज'च्या दिग्दर्शकांच्या हातापाया का पडली होती प्रियंका?

प्रियंका चोप्रानं नुकत्याच एका मुलाखतीत 'ऐतराज' सिनेमाचा एक किस्सा सांगत हैराण करून सोडले आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraEsakal

Priyanka Chopra: प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून बिनधास्त व्क्तव्य करताना दिसत आहे. अभिनेत्रीनं यावेळी बॉलीवूडची पूरती वाट लावली आहे. या ग्लॅमर जगतातल्या अनेक आतल्या गोटातल्या गोष्टी समोर आणत तिनं पोलखोल केली आहे.

आता नुकतंच तिनं तिच्या 'ऐतराज' सिनेमाविषयी बातचीत केली आहे. या सिनेमातील एका बोल्ड सीनमुळं तिला अक्षरशः लाज वाटत होती असं ती म्हणाली आहे.

प्रियंका चोप्रानं आपल्या मुलाखतीत याआधीच स्पष्ट केलंय की तिनं अभिनय शिकण्यासाठी कोणताही क्लास लावला नाही. ती जे शिकली ते शूटिंगच्या सेटवर. 'ऐतराज' प्रियंकाच्या करिअरमधला असा सिनेमा आहे ज्यामुळे तिच्यातील अभिनय क्षमतेला जगासमोर आणलं आणि इंडस्ट्रीत पुढे जाण्यास मदत केली. (Priyanka Chopra reveal about her intimate scene aitraaz movie)

Priyanka Chopra
Manoj Bajpayee: जेव्हा मुलीमुळं मनोज बाजपेयीवर आलेली मान खाली घालण्याची वेळ.. अभिनेत्यानं शेअर केला किस्सा

आता प्रियंकानं अनुपम खेर यांच्यासोबतच्या मुलाखती दरम्यान 'ऐतराज' विषयी एक इंट्रेस्टिंग किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली,'क्रिश सिनेमासाठी राकेश रोशन यांनी माझी निवड केली आणि निश्चित केलं की सिनेमात हृतिक सोबत प्रियंकाच दिसणार. 'क्रिश' सिनेमा प्रियंकाला 'ऐतराज' मुळेच मिळाला होता.

प्रियंका म्हणाली,''राकेश रोशन यांनी मला कुणाच्यातरी अंतिम संस्कारा दरम्यान पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी मला कॉल केला''.

ते म्हणाले, ''मी तुला एका अंतिम संस्कारा दरम्यान पाहिलं..तू खूप सुंदर दिसतेस''.

मी म्हटलं,''माफ करा सर,मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे. मी पांढऱ्या रंगाचा सलवार-कुर्ता घातला होता. मेकअपही केला नव्हता. असो,महत्त्वाचं आहे,राकेश रोशन यांनी मला कॉल केला होता आणि हे सगळं 'कहो ना प्यार है' नंतर घडत होतं. त्यांना 'ऐतराज' मधील माझं काम पाहायचं होतं''.

प्रियंका पुढे म्हणाली की,''त्यानंतर मला टेन्शन आलं कमालीचं. मी अब्बास मस्तान यांना फोन केला आणि म्हटलं की, हे पहा हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे,कृपया त्यांना माझा इंटरवल सीन दाखवू नका. त्या सीनमध्ये मी अक्षयची जी व्यक्तीरेखा आहे तिचं शारिरीक शोषण करत असते''.

Priyanka Chopra
The Kerala Story सिनेमा विरोधात मॉरिशसमध्ये मोठा कट.. थिएटर मालकाला मिळालेल्या धमकीत म्हटलंय..

पुढे प्रियंका म्हणाली,''खरंतर यानंतर झालं उलटं. राकेश रोशन यांनी तो सीन पाहूनच मला क्रिशसाठी कास्ट केलं. मला खूप लाज वाटत होती तेव्हा मी त्यानंतर काही दिवस त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नव्हती''.

Priyanka Chopra
The Diary Of West Bengal: 'माझी जेलमध्ये हत्या होऊ शकते..', 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'च्या दिग्दर्शकाच्या पोस्टनं खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com