Dipika Kakar Baby Boy
Dipika Kakar Baby BoyEsakal

Dipika Kakar Baby Boy: दीपिका अन् शोएबच्या घरी आला छोटा पाहुणा...

Published on

Dipika Kakar Baby Boy: ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी आज छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दोघेही आई-वडील झाले आहेत. त्यांना मुलगा झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिपिका तिच्या गरोदरपणाबद्दल चर्चेत होती. नुकतिच दोघांनी अधिकृत पोस्टद्वारे ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेयर केली आहे. या जोडप्याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे

Dipika Kakar Baby Boy
Sameer Wankhede Bribery Case: 25 कोटी वसुली प्रकरणात शाहरुख अन् आर्यनचा जबाब नोंदणार? नवा ट्विस्ट!
Dipika Kakar Baby Boy
Dipika Kakar Baby Boy

शोएब इब्राहिमने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना माहिती दिली त्यात त्याने लिहिलं की, 'आज 21 जून 2023 रोजी सकाळी आमच्या घरी मुलाचा जन्म झाला. ही प्रीमॅच्युअर डिलीव्हरी होती, पण घाबरण्याचे काही नाही. फक्त प्रार्थना आणि आशीर्वाद देत राहा.

ही गोड बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी दोघांवरही कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून दीपिका कक्कड तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत होती. ती बरेच अपडेट्स अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असायची आता मुलाच्या आगमनानंतर दोघेही खुप खुश आहेत.

Dipika Kakar Baby Boy
Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी घेणार रिटायरमेंट? नंतर मुंबई सोडणार अन्
Dipika Kakar Baby Boy
Karan Johar: करण जोहरची हवा! भारतात टिका तर ब्रिटनच्या संसदेत सत्कार

दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. त्यांनी 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दीपिका आणि शोएबच लग्न मूळ गावी मौदाहा, यूपीमध्ये झाला होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका कक्करने लग्नानंतर फारसे काम केलेले नाही आणि ती फक्त ' कहाँ हम कहाँ तुम' या मालिकेत दिसली आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com