esakal | रामदेव बाबा मूर्ख माणूस, दिग्दर्शक हंसल मेहतांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdev Baba

रामदेव बाबा मूर्ख माणूस, दिग्दर्शक हंसल मेहतांची टीका -

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाच्या काळात एकीकडे कोरोनाग्रस्तांना मदत करणा-यांची संख्य़ा वाढत आहे तसेच दुसरीकडे वेगवेगळ्या कारणांवरुन बेताल वक्तव्य करणारेही काही कमी नाहीत. अलीकडेच प्रसिध्द योगगुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी औषधांमुळे (Allopathy Treatment) कोरोना झालेले पेशंट मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत असल्याचे धक्कादायक विधान केले होते. त्यामुळे वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आयएमएनं केली होती. याप्रकरणात खुद्द देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Health Minister Harshavardhan)यांना प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. ( Director Hansal Mehta Slams Baba Ramdev His Statement On Allopathy And Doctors)

रामदेव बाबांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यावर बॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता ( Director Hansal Mehta ) यांनीही रामदेव बाबांवर (Ramdev baba) टीका केली आहे.हंसल मेहता हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. ते जसे प्रतिभावान दिग्दर्शक आहेत त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर सडेतोड आणि परखड मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांनी आता रामदेव बाबांवर प्रहार केला आहे. रामदेव बाबांनी आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियेनंतर पुन्हा एक व्टिट केले आहे. त्यात त्यांनी वैदयकीय उपचार करणा-यांना 25 प्रश्न विचारले आहेत.

त्या 25 प्रश्नांवर हंसल मेहता यांनी रामदेव बाबांना चांगलेच सुनावले आहे. मेहता म्हणाले, हा मूर्ख माणूस आपल्या फ्रंटलाईन वर्कर्सचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहे. मेहता यांचे हे व्टिट आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. त्यालाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रामदेव बाबांच्या भक्तांनी यावेळी मेहता यांनाही उत्तरं दिली आहेत. रामदेव बाबांनी आपल्या त्या 25 प्रश्नांमध्ये हेपॅटायटिस, लिव्हर सोरायसिस, हार्ट एनलार्जमेंट, डायबेटीस, थॉयराईड, बायपास. मायग्रेन. पायरिया सारख्या आजारांवर डॉक़्टरांना प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा: कधी गच्चीवर, कधी अंगणात.. प्रिया बापटचं लॉकडाउन फोटोशूट हिट

हेही वाचा: KRK विरोधात सलमानने केला मानहानीचा दावा; 'राधे'वर टीका करणं पडलं महागात

हंसल मेहता यांच्या या व्टिटमुळे रामदेव बाबांचे ते वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आतापर्यत त्यांच्यावर अनेक सेलिब्रेटींनी टीका केली आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेव बाबा यांना आपले विधान मागे घेण्यास सांगितले होते. मात्र त्याऐवजी रामदेव बाबांनी पुन्हा व्टिट करुन डॉक्टरांवर निशाणा साधला आहे.