"मुघल हे खरे राष्ट्र निर्माते होते"; कबीर खानच्या वक्तव्यावरून वाद

"मुघल हे खरे राष्ट्र निर्माते होते"; कबीर खानच्या वक्तव्यावरून वाद

"मुघलांना नकारात्मक भूमिकेत दाखवायचं असेल तर कृपया आधी त्यावर संशोधन, अभ्यास करा"

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खानने Kabir Khan मुघल साम्राज्याबद्दल Mughals केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मुघलांचं चित्रण याबद्दल तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. "केवळ कथेला लोकप्रिय करण्यासाठी चित्रपटांमध्ये मुघलांना नकारात्मक दाखवलं जातं, हे खरोखर निराशाजनक आहे. एखाद्या दिग्दर्शकाने त्या गोष्टींवर संशोधन केलं असेल, अभ्यास केला असेल आणि त्याला त्याचा वेगळा मुद्दा अधोरेखित करायचा असेल तर मी समजू शकतो. अर्थात, लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात. पण जर तुम्हाला खरंच मुघलांना नकारात्मक भूमिकेत दाखवायचं असेल तर कृपया आधी त्यावर संशोधन करा आणि ते खलनायक का होते हे आम्हाला नीट समजावून सांगा," असं तो म्हणाला.

"मुघल हे देश उभारणारे खरे शासक होते"

मुघलांच्या चित्रणाविषयी कबीर खान पुढे म्हणाला, "जर योग्य संशोधन केलं आणि ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेतला तर मुघलांना खलनायक का व्हावं लागेल हे समजणं फार कठीण आहे. माझ्या मते ते खरे राष्ट्रनिर्माते होते आणि त्यांनी लोकांची हत्या केली असं म्हणत असाल तर तुम्ही कशाच्या आधारे हे म्हणत आहात? त्याविषयी आधी कृपया ऐतिहासिक पुरावे द्या."

"चित्रपटाचे वाईट राजकारण अस्वस्थ करणारे"

"मी वाईट लेखन, वाईट कॅमेरावर्क आणि वाईट एडिटिंगसुद्धा एकवेळ माफ करू शकतो. पण मी चित्रपटांचं वाईट राजकारण कधीही सहन करू शकत नाही. कारण चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि ते खरोखरच लोकांना प्रभावित करू शकतात", असं कबीर खान म्हणाला.

"मुघल हे खरे राष्ट्र निर्माते होते"; कबीर खानच्या वक्तव्यावरून वाद
सलमानला अडवणाऱ्या CISF अधिकाऱ्यावर कारवाई नाही, तर..

कबीर खानच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. मुघलांच्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 'कबीर खान आता तालिबान्यांचं कौतुक करणारा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस आणेल', अशी टीका एकाने केली. तर काहींनी त्यावर मीम्ससुद्धा पोस्ट केले आहेत.

कबीर खानने २००६ साली 'काबूल एक्स्प्रेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये जॉन अब्राहम आणि अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिका होत्या. अफगाणिस्तानमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं होतं. त्यानंतर 'बजरंगी भाईजान', 'एक था टायगर' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन कबीरने केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com