नागराज मंजुळे सलग चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

शुक्रवार, 13 एप्रिल 2018

'पावसाचा निबंध' या लघुपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट ऑडिओग्राफिचा पुरस्कार या लघुपटाला प्रदान करण्यात आले आहे.

नागराज मंजुळे यांचा 'पावसाचा निबंध' या लघुपटाला विशेष गौरवण्यात आले आहे. नागराज मंजुळे यांना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘आटपाट प्रॉडक्शन्स’ निर्मित या लघुपटाची कथा नागराज यांनीच लिहिली आहे. विशेष म्हणजे ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाची निवड ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेलिस 2018’मध्ये झाली आहे. आज (ता. 13) IFFLA मध्ये ‘पावसाचा निबंध’ प्रदर्शित होणार आहे आणि आजच या लघुपटाने राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान पटकाविला आहे. 

'पावसाचा निबंध' या लघुपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट ऑडिओग्राफिचा पुरस्कार या लघुपटाला प्रदान करण्यात आले आहे. ‘सैराट’नंतर नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले होते. मध्यंतरी त्यांनी 'द सायलेंस' या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटात भुमिका केली होती. आता दोन वर्षांनंतर ‘पावसाचा निबंध’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापुर्वीही नागराज मंजुळे यांना 'पिस्तुल्या' या लघुपटासाठी नॉन फिचर शॉर्ट फिल्म कॅटेगरी अवॉर्ड, 'फॅन्ड्री' चित्रपटासाठी बेस्ट डेब्यु डायरेक्टर आणि 'सैराट' चित्रपटासाठी विशेष उल्लेख (फिचर फिल्म) अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Director Nagraj Manjule Got Forth Time National Award