प्रभासचा 'आदिपुरुष' 2022 मध्ये;ओम राऊत यांचे दिग्दर्शन

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राऊत यांनी ट्विटव्दारे ही माहिती दिली आहे.

मुंबई - बाहुबली नंतर प्रभासची लोकप्रियता कमालीची वाढली. बॉलीवूडमध्ये त्याचा बोलबोला झाला. बाहुबलीच्या दोन्ही भागातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारले. अशा प्रभासचा एक वेगळा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राऊत यांनी ट्विटव्दारे ही माहिती दिली आहे.

या चित्रपटात प्रभास दिसणार आहे. त्याच्या जोडीला सैफ अली खानही त्यात झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुष चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सध्या हा विषय ट्रेंडिंग आहे.  हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याबद्दल दिग्दर्शक राऊत यांनी माहिती दिली आहे.

आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून बराच वेळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. 

सलमान खानचा ड्रायव्हर आणि दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण, सलमानने स्वतःला केलं आयसोलेट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Raut (@omraut)

श्रीरामचंद्र यांच्यावर आधारित हा चित्रपट असल्याची चर्चा आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे.  सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत.

हे ही वाचा: कपिल शर्माने 'या' कारणासाठी केलं 11 किलो वजन कमी, 'बिहाईंड द सीन्स' व्हिडिओमध्ये झाला खुलासा

२०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Om raut announced release date of Adipurush movie