esakal | जावेद अख्तर-सलीम खान जोडीवर येणार माहितीपट
sakal

बोलून बातमी शोधा

javed akhtar and salim khan

जावेद अख्तर-सलीम खान जोडीवर माहितीपट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - शोले, दीवार, जंजीर, डॉन, त्रिशुल सारख्या चित्रपटांचे लेखन करुन भारतीय प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान सलीम खान आणि जावेद अख्तर (javed akhtar and salim khan ) यांनी केले आहे. 80 च्या दशकांत त्यांनी आपल्या नावाचा दबदबा तयार केला होता. कालांतराने त्या दोघांमध्ये काही कारणास्तव कटूता आली. मात्र त्यांचे बॉलीवूडला असलेले योगदान विसरता येणार नाही. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि जावेद अख्तर यांची मुलगी झोया अख्तर (Director zoya akhtar) यांना दोन प्रख्यात पटकथाकारांवर एक माहितीपटाची निर्मिती करणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून झोया त्या डॉक्युमेंट्रीवर काम करत आहे. (Director zoya akhtar make a film on father javed akhtar and salim khan life)

बॉलीवूडच्या (bollywood) सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून झोयाचे नाव घेतले जाते. ती आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शनासाठी प्रसिध्द आहे. तिनं आतापर्यत लक बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी ना दोबारा, दिल धडकने दो, गली बॉय सारख्या हटक्या चित्रपटांचे तिनं दिग्दर्शन केलं आहे. तिच्या गली बॉय (gully boy) चित्रपटानं जगभरात प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. काही काळ हा चित्रपट ऑस्करच्या(oscar) शर्यतीतही होती. आता प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.

पिंकविलानं दिलेल्या माहितीनुसार, झोया अख्तर (Director zoya akhtar) ही गेल्या दोन वर्षांपासून आपले वडिल जावेद अख्तर आणि त्यांचे मित्र सलीम खान यांच्या आयुष्यावर आधारित एका माहितीपटाची निर्मिती करत आहे. तिनं त्या माहितीपटाची तयारीही सुरु केली आहे. त्यासाठी तिनं त्या दोघांविषयीची सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या माहितीपटाशी जोडल्या गेलेल्या एकानं दिलेल्या माहितीनुसार, सलीम आणि जावेद यांनी बॉलीवूडला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. झोयाला ही गोष्ट फारच महत्वाची वाटते. त्यामुळे तिनं प्रेक्षकांसाठी या माहितीपटाची निर्मिती करणार आहे.

झोयाला हा माहितीपट थिएटरमध्ये प्रदर्शित करायचा होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता तिला ते शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे कदाचित हा माहितीपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता अधिक आहे. वास्तवात जावेद अख्तर आणि सलीम आपल्याविषयीची माहिती या प्रोजेक्टसाठी देणार आहेत का याविषयी अधिकृत माहिती नाही. मात्र भविष्यात हा माहितीपट तयार झाल्यास तो बॉलीवूडच्या प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक यांच्यासाठी ऐतिहासिक दस्ताऐवज ठरु शकतो.

हेही वाचा: जस्मिनच्या कपड्यांची अजब स्टाईल, तुम्ही व्हाल अवाक्!

हेही वाचा: ऐन लग्नात फुटणार डॉ. अजित कुमारचं बिंग; डिंपललाही होणार अटक?

जावेद अख्तर आता आपला मुलगा फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यासोबत कमबॅक करणार आहेत. तब्बल 15 वर्षानंतर ते पुन्हा पटकथा लेखनाच्या बाबत पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे.