esakal | भावी सुनेनं उचललं 80 किलो वजन: सासुनं दिली कमेंट, व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

disha patani work out

भावी सुनेनं उचललं 80 किलो वजन: सासुनं दिली कमेंट, व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी (DISHA PATANI) तिच्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्टंटसाठी प्रख्यात आहे. त्यासाठी ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा बॉयफ्रेंड असणारा टायगर श्रॉफ (TIGER SHORFF) हा सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन म्हणून नावारुपाला आला आहे. आता दिशा पटानी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिचा वर्क आऊट करतानाचा एक व्हिडिओ. त्यामध्ये तिनं जे धाडस केले आहे त्याचे तिच्या चाहत्यांनी कौतूक केले आहे. (disha patani lifts 80 kg weight tigers sister krishna shroff and mother commented)

दिशा ही तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. आपल्या फिटनेस आणि वर्कआऊटचे वेगवेगळे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेयर करत असते. काही दिवसांपूर्वी तिचा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (SALMAN KHAN) सोबत राधे (RADHE) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अर्थात तो बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही. त्यात दिशाच्या वाट्य़ाला मोठी भूमिका नव्हती. मात्र त्यासाठी तिला काही अंशी दिलासा मिळाला आहे. प्रेक्षकांनी तिचं कौतूक केलं होतं.

दिशानं आता सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यात तिनं 80 किलोचे वेटलिफ्टिंग केले आहे. दिशानं तो व्हिडिओ आपल्या इंस्टावरुन पोस्ट केला आहे. त्यासाठी तिला तिच्या ट्रेनरनं मदत केली आहे. मात्र त्यावेळी ती म्हणते एवढं वजन उचलण्याचे काम मी एकटी करु शकते. आणि ती ते 80 किलोचे वेटलिफ्टिंग करु लागते. ते पाहून तिच्या ट्रेनरला नवल वाटले आहे. त्यानं दिशाला चिअर अप केले आहे. टाळ्या वाजवून तिचा आत्मविश्वास वाढवला आहे. काही तासांपूर्वी शेयर केलेल्या त्या व्हिडिओला आतापर्यत सहा लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

हेही वाचा: रोहिणी हट्टंगडींनी सांगितली दिलीप कुमार यांच्यासोबतची खास आठवण

त्या व्हिडिओवर टायगर श्रॉफच्या आईनं (आयशा श्रॉफ) आणि बहिणीनं (कृष्णा श्रॉफ) कौतूक केलं आहे. त्यांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. दिशाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती एक व्हिलन रिटर्न्स आणि केटिना नावाच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दिशा आणि टायगर श्रॉफच्या नात्याबद्दल सध्या बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यांना अनेकदा एकत्र असताना कॅमेऱ्यात कैद केले गेले आहे.

loading image