
सध्या दिशापेक्षा तिच्या बहिणीची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. दिशाच्या मोठ्या बहिणींचं नाव खुशबू पटानी आहे.
मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी ही नेहमीच चर्चेत असते. तिच्या फिटनेस आणि डान्समुळे ती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. दिशा अनेक चित्रपटांमधून आणि गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. दिशाच्या सोशल मिडीयावरील फोटोला नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळते.
सध्या दिशापेक्षा तिच्या बहिणीची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. दिशाच्या मोठ्या बहिणींचं नाव खुशबू पटानी आहे. खुशबू देखील दिशासारखीच फिटनेस फ्रिक आहे. खुशबू भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणूनही देशाची सेवा करीत आहे.
खूशबू सोसल मिडीयावर सतत अॅक्टीव असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ ती पोस्ट करत असते.
दिशा आणि खूशबुचे नाते फक्त बहिणींचे नसून त्या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
दोघींचे वर्कआऊट करतानाचे तसेच मज्जा मस्ती करतानाचे व्हिडीओ खुशबु नेहमी सोशल मिडीयावर पोस्ट करत आसते.
दिशा एवढाच फॅन बेस खुशबूचा आहे. खुशबू फिटनेस फ्रिक असल्याने तिच्या चाहत्यांना ती फिटनेससाठी प्रोत्साहित करत असते. सुंदरतेमुळे दिशापेक्षा खुशबूची चर्चा सध्या सोशल मिडीयावर होत आहे.