"दिया और बाती हम'चा लवकरच सिक्वेल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई : एखादा चित्रपट यशस्वी झाला की, त्याचा सिक्वेल बनविण्याचा ट्रेण्ड हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच रुजलेला आहे. 
आता हिंदी मालिकांमध्येही हा ट्रेण्ड सुरू झाला आहे. स्टार प्लस या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या "दिया और बाती हम' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. "तू सूरज मै सांझ पियाजी' असे त्या नव्या मालिकेचे नाव आहे. 

मुंबई : एखादा चित्रपट यशस्वी झाला की, त्याचा सिक्वेल बनविण्याचा ट्रेण्ड हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच रुजलेला आहे. 
आता हिंदी मालिकांमध्येही हा ट्रेण्ड सुरू झाला आहे. स्टार प्लस या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या "दिया और बाती हम' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. "तू सूरज मै सांझ पियाजी' असे त्या नव्या मालिकेचे नाव आहे. 
"स्टार प्लस' या वाहिनीवर "दिया और बाती हम' ही मालिका अनेक वर्षे सुरू होती. प्रेक्षकांचा तिला चांगला प्रतिसाद लाभला. ही मालिका म्हणजे दोन अकल्पनीय व्यक्तींची अनोखी साथसंगत होती. सूरज आणि संध्या ही जोडी कमालीची लोकप्रिय ठरली. या मालिकेने अनेक झापडबंद; तसेच पारंपरिक संकल्पना चक्काचूर केल्या. सुनेच्या प्रगतीच्या आड येणारा सर्वांत मोठा अडथळा म्हणजे तिची सासू. ही संकल्पना या मालिकेने उद्‌ध्वस्त केली. लग्नानंतरही आपला पती आणि घरच्या व्यक्तींच्या मदतीने आपली स्वप्ने व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारा एक विश्‍वास अनेक स्नुषांना सूरज व संध्या या जोडीने दिला. मालिकेतील हे जोडपे राहत असलेली हनुमान गल्ली ही काल्पनिक जागा होती. या मालिकेमुळे राजस्थानातील पुष्कर येथील एका गल्लीचे नामकरण हनुमान गल्ली असे केले. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने एक्‍झिट घेतली खरी; परंतु प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव ही मालिका पुन्हा नव्या जोमात आणि जोशात येत आहे. तब्बल 20 वर्षांनी कथानक पुढे नेले आहे. या मालिकेचा शेवट झाला तेथूनच नव्या कथानकाला सुरुवात होणार आहे. सूरज आणि संध्या यांचे पुढे काय झाले, या प्रश्‍नाचे उत्तर नव्या भागात मिळेल. या मालिकेतील भाभो केरळमध्ये कशी? सूरज आणि संध्या यांची मुले आता कोठे आहेत? वेद, वंश आणि कनक या काय करत आहेत? कसे आहेत? या गोष्टींचा उलगडा नव्या भागात होणार आहे. "दिया और...'मध्ये सासूची अर्थात भाभोची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनू वाघेला नव्या मालिकेत काम करणार आहे. याबाबतीत ती म्हणाली की, नव्या मालिकेचे चित्रीकरण केरळमध्ये होत आहे. केरळच का, या प्रश्‍नाचे उत्तर लवकरच तुम्हाला मिळेल. पहिल्या भागाप्रमाणे भाभोला दुसऱ्या भागातही प्रेक्षकांची पसंती मिळेल, अशी आशा आहे. नव्या भागात भाभोचा लूक काहीसा बदलण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diya aur bati hum squel