Neena Gupta: विवाहित पुरुषाशी लग्न न करण्याचा सल्ला देणाऱ्या नीना गुप्ता पर्सनल आयुष्यावर झाल्या व्यक्त

इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी विवाहित पुरुषांशी लग्न न करण्याचा सल्ला दिलाय.
 Neena Gupta: revealed her life secrets in an interview
Neena Gupta: revealed her life secrets in an interviewesakal
Updated on

प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी येतात. मग तो सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी विवाहित पुरुषांशी लग्न न करण्याचा सल्ला दिलाय. नीना गुप्ता या त्यातल्याच एक अभिनेत्री आहेत. स्वत:च्या हिमतीवर प्रियकराच्या मुलीला जन्म देत या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात सिंगल मदरची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली आहे. (Neena Gupta: revealed her life secrets in an interview)

नीना गुप्ता या त्यांच्या ऑटोबायोग्राफीमुळे चर्चेत आल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी सिंगल मदर होणं आणि त्यात मुलीला वाढवणं हा सगळा जीवनप्रवास सांगितलाय. या ऑटोबायोग्राफीमुळे नीनाच्या आयुष्यातील अनेक नाजुक गोष्टी पुढे आल्या आहेत. नीना गुप्ता यांचा मसाबा मसाबा सीरीजचा दुसरा सीजनही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

यादरम्यान त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टींवर त्या व्यक्त झाल्या. यावेळी नीना गुप्ता वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल दखील बोलल्या. आपण ज्या व्यक्तींवर प्रेम करतो त्याच्या बद्दल द्वेश भावना कधीच नसावी. मला रिचर्ड्स आवडत होते म्हणूनच मी त्यांच्या बाळाला जन्म दिला. तसेच नीना गुप्ता आणि रिचर्डची मुलगी मसाबा हिच्याशी त्यांचे किती जवळचे नाते आहे हेही त्यांनी यावेळी सांगितले.

 Neena Gupta: revealed her life secrets in an interview
Neena Gupta: 'डिलिव्हरीसाठी पैसेसुद्धा नव्हते, पण..'

नीना गुप्ता या क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या अभिनयामुळे त्या सध्या लाईमलाईटमध्ये असतात. नीना गुप्ता यांनी अनेक चित्रपटांत आणि वेब सीरीजमध्ये काम केले आहे. पंचायत, डायल १००, शुभमंगल ज्यादा सावधान, पंगा, बधाई हो अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com