Dobaara Trailer: तापसीचा 'दोबारा' पाहून उडेल भीतीनं थरकाप! |Dobaara Trailer viral on social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dobaara movie trailer

Dobaara Trailer: तापसीचा 'दोबारा' पाहून उडेल भीतीनं थरकाप!

Dobaara Trailer : बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री तापसी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तिचा शाब्बास मिथु नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला काही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तापसी एका नव्या प्रोजेक्टमध्ये काम (b करण्यास तयार झाली आहे. त्या चित्रपटाचे नाव दोबारा असे आहे. त्याचे दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप करणार आहे. आज दोबाराचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की, तापसी ही सतत एका खुनाच्या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र ते तिला काही सहजासहजी मिळत नाही. चित्रपटामध्ये तापसीचा संघर्ष मांडण्यात आला आहे. तिला 12 वर्षाच्या मुलाचा जीव वाचविण्याची दुसऱ्यांदा संधी मिळते. दोबारा हा स्पॅनिश फिल्म मिराज हा हिंदी रिमेक आहे, या चित्रपटामध्ये तापसी ही पावेल गुलाटीसोबत दुसऱ्यांदा स्क्रिन शेयर करणार आहे. यापूर्वी त्यांनी थप्पड नावाच्या चित्रपटाममध्ये काम केलं होतं.

तापसीनं तिच्या इंस्टा अकाउंटवरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगितले आहे. तापसीनं फिल्मच्या प्रमोशनचा एक व्हिडिओ यावेळी शेयर केला आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, अनुरागसोबत पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी मी तयार आहे. कधी कधी आपल्याला दुसरी एखादी संधी हवी असते. ती मिळाल्यास मग छान वाटतं. एक बाब अशी पण आहे की, वेळेच्या अगोदर कोणती संधीही आपल्याला मिळत नाही. अशावेळी आपल्यासमोर जे आहे ते प्रभावीपणे करणे हेच आपल्या हातात असते. तापसीनं म्हटलं आहे.

हेही वाचा: Viral Video: 'हर-हर शंभू!' गाणारी शाळकरी मुलगी 'अभिलिप्सा पंड्डा' आहे कोण?

तापसी आणि अनुराग कश्यप हे काही पहिल्यांदाच एकत्रितपणे काम करत नाही यापूर्वी अनुरागच्या मनमर्जियामध्ये देखील त्यांनी काम केले होते. त्यात विकी कौशल, अभिषेक बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. मनमर्जिया हा बॉक्स ऑफिसवर काही फारसा चालला नाही. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित एखादी कलाकृती प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हेही वाचा: Kargil War : कॅप्टन विक्रम बत्रांची जगातील सर्वात मोठी अंडर वॉटर प्रतिमा; पाहा Video

Web Title: Dobaara Trailer Viral On Social Media Director Anurag Kashyap Actress Taapsee Pannu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..