डॉक्टरचं ‘सपान लागलं’ चर्चेत, सोशल मीडियावर हवा

मनोरंजनसृष्टीत बरेच कलाकार मल्टी टॅलेंटेड असतात. अभिनयाव्यतिरिक्त पेंटिंग, स्पोर्ट्स, हस्तकला, शिल्पकला, लिखाण ई मध्येही पारंगत असतात.
डॉक्टरचं ‘सपान लागलं’ चर्चेत, सोशल मीडियावर हवा

मुंबई - मनोरंजनसृष्टीत बरेच कलाकार मल्टी टॅलेंटेड असतात. अभिनयाव्यतिरिक्त पेंटिंग, स्पोर्ट्स, हस्तकला, शिल्पकला, लिखाण ई मध्येही पारंगत असतात. आता अभिनेता ओंकार परदेशीचेच उदाहरण घ्या ना. ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटात ओंकार ने पार्थ भालेरावच्या मित्राच्या भूमिकेत धमाल उडवून दिली होती. याच ओंकारकडे कवितेचे अंग सुद्धा आहे आणि त्याने एका गाण्याचे बोल लिहिले आहेत. ‘सपान लागलं’ असं त्या गाण्याचं शीर्षक असून या म्युझिक व्हिडिओत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

सर्वस्व एंटरटेन्मेन्ट च्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडीओ रिलिज होणार आहे. यात ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशी रोमँटिक अवतारात दिसणार असून त्याची नवोदित तारका रुची कदम सोबत रोमँटिक जोडी जमली आहे. रुची कदम सोशल मीडिया स्टार असून या व्हिडिओत ज्ञानेश्वरी गायकवाड सुद्धा झळकणार आहे. हे गाणे गायलेय सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे यांनी. ओंकार परदेशी यानेसुद्धा गाण्यात भाग घेतला असून याचे संगीत दिलंय संगीतकार अनिल काकडे यांनी. सिद्धेश सानप यांनी या म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलीय. ओंकार परदेशी चे शब्द, आवाज आणि अभिनय असलेला म्युझिक व्हिडीओ ‘सपान लागलं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मराठी सेलिब्रेटींनी मोठ्या प्रमाणावर मनोरंजन क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यावरुन प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाणही आले आहे. गणरायाच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लाडक्या बाप्पाला मानवंदना म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सादर केलेली कलाकृती मोठी दिलासा देणारी ठरली आहे.

डॉक्टरचं ‘सपान लागलं’ चर्चेत, सोशल मीडियावर हवा
पाहा Bigg Boss मराठी 3 चं संपूर्ण घर; पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com