Don 3: प्रियंकाचा पत्ता कट,'ही' मराठमोळी अभिनेत्री बनणार शाहरुखची रोमा? Mrunal thakur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Don 3: Priyanka Chopra Out, Who is new 'Roma', who will replace Priyanka?

Don 3: प्रियंकाचा पत्ता कट,'ही' मराठमोळी अभिनेत्री बनणार शाहरुखची रोमा?

Shahrukh Khan Don 3: शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ३ सिनेमांना घेऊन भलताच चर्चेत आहे. तर दुसरीकडे मृणाल ठाकूर(Mrunal Thakur) तिच्या 'सीता रामम'साठी खूप वाहवा लूटताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाला,ही कसली बातमीची सुरुवात,काय आहे कनेक्शन. तर हो सांगतो तुम्हाला,थोडा धीर धरा. तर मृणाल ठाकूरने तिच्या 'सीता रामम' च्या यशानंतर ट्वीटरवर काही दिवसांपूर्वीच #askmrunal हे चॅट सेशन ठेवलं होतं,जिथे चाहत्यांच्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं तिनं दिली. या सेशन दरम्यानच एका प्रश्नानंतर 'डॉन ३' मध्ये प्रियंकाच्या जागी तिच्या भूमिकेला घेऊन खूप चर्चा रंगताना दिसून आली.(Don 3: Priyanka Chopra Out, Who is new 'Roma', who will replace Priyanka?)

हेही वाचा: 'कुछ बातें करने का मन करता है...',बॉयकॉट ट्रेन्डवर आता अमिताभनी ओढले ताशेरे

काय आहे पूर्ण प्रकरण?

शाहरुखच्या डॉन ३ विषयी सगळ्यांमध्येच खूप उत्सुकता आहे. सिनेमात शाहरुख खान डॉनची मुख्य भूमिका साकरतो तर प्रियंकाही याआधीच्या भागात रोमाची भूमिका साकारताना दिसली आहे. काही दिवसांपूर्वीच #askmrunal सेशन दरम्यान सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं की, 'मृणाल, शाहरुख खान सोबत रोमाच्या भूमिकेत'. या ट्वीटला उत्तर देताना मृणाल म्हणाली,'ड्रूीम.. ', तर तिने ते ट्वीट फरहान अख्तरलाही टॅग केलं. कारण फरहान अख्तरच 'डॉन' सिनेमाचा दिग्दर्शक आहे.

Sita Raman Actress Mrunal Thakur tweet over fan requesting her to replace priyanka chopra

Sita Raman Actress Mrunal Thakur tweet over fan requesting her to replace priyanka chopra

मृणाल ठाकूरच्या या ट्वीटवर सोशल मीडियावर मात्र तुफान प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. अर्थात अधिकृतरित्या यावर काहीच बोललं गेलेलं नाही. पण सोशल मीडियावर मात्र मृणालनं हिंट दिलीय अशी चर्चा रंगली आहे. कोण बोलतंय,'मृणाल आता 'डॉन ३' मध्ये दिसणार आहे, तर काहींना मात्र वाटतंय की रोमा ची भूमिका प्रियंकाशिवाय दुसरं कुणी चांगलं करू शकत नाही'. तर काहींनी तेर थेट म्हटलंय,'आता मागच्या काही प्रकरणांमुळे हे दोघे एकत्र तर काम करणार नाहीत,तेव्हा रोमा नवीनच कुणीतरी साकारणार,मग ती मृणाल असू शकते'.

हेही वाचा: 'बॉयकॉट ट्रेन्डचं प्लॅनिंग बॉलीवूडमधील...' मंदाकिनीचा खळबळजनक खुलासा

मृणाल ठाकूर विषयी बोलायचं झालं तर तिने हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मृणालनं तेव्हा आपल्या अभिनयानं सर्वांचे मन जिंकले होते. त्यानंतर मृणाल 'बाटला हाऊस','घोस्ट स्टोरी','तुफान','जर्सी' अशा सिनेमातून मुख्य अभिनेत्रीच्या रुपात दिसली. सध्या मृणाल दुलकर सलमान सोबतच्या 'सीता रामम' सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. त्याव्यतिरिक्त 'पिप्पा','आंख मिचौली','गुमराह','पूजा मेरी जान' या सिनेमातही मृणाल दिसणार आहे.

Web Title: Don 3 Priyanka Chopra Out Who Is New Roma Who Will Replace

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..