esakal | 'स्वत;ला विचारा,माझ्यावरुन तुमची नजर का हटत नाही'?
sakal

बोलून बातमी शोधा

kashmira new photo

कृष्णाने जी काही कमेंट केली त्या मागच्या भावना तर समजून घ्या ना. कृष्णा माझा नवरा असून त्याला माझ्या ज्या गोष्टी आवडतात त्या विषयी तो बोलणारच’ अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. 

'स्वत;ला विचारा,माझ्यावरुन तुमची नजर का हटत नाही'?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  मॉडेल व अभिनेत्री म्हणून प्रसिध्द असणा-या कश्मिरानं तिचं एक हॉट फोटो शुट शेयर केलं आहे. त्याला नेटक-यांनी भरपूर लाईक्स आणि कमेंटस दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने म्हणजे कृष्णा अभिषेकने कश्मिराच्या फोटोवर गंमतीशीर कमेंट केली होती. त्याला दिलेल्या कश्मिराच्या प्रतिक्रियेमुळे ती चर्चेत आली होती. ते कुठे न संपते तोच तिचा एक नवीन लुक समोर आला आहे.

कश्मिराने तिचे बिकनीतील फोटोशुट सोशल मीडियावर शेयर केले आहे. त्याला तिच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आहे. तिचा हा हॉट अंदाज अनेकांना भावला आहे. या वयातही मी हॉट दिसते आहे याचा मला दोष देऊ नका. मला पाहताना तुम्हाला तुमचे डोळे का मिटावेसे नाहीत हा प्रश्न तुम्ही स्वतला विचारा असेही तिने चाहत्यांना विचारले आहे. कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने गेल्या काही दिवसांपूर्वी आपली पत्नी कश्मिरा शाहच्या एका फोटोवर गंमतीशीर कमेंट दिली होती.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याची ती पोस्ट व्हायरल झाली होती. अनेकांनी त्याला त्याच्याच सारख्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. कृष्णाच्या अशाप्रकारच्या पोस्टमुळे तो नेटक-यांच्या टीकेला सामोरा गेला होता.

आपली बायको एवढी सुंदर दिसत असताना आपण दुस-या स्त्रीकडे कसे पाहु अशा असा अर्थ सुचित करणारी ती पोस्ट आहे. कश्मीराने ब्लॅक लो कट मोनॉकिनीवर नुकतंच फोटोशूट केलं. त्या फोटोशूटमधील एक फोटो कृष्णाने त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला.

कश्मीराच्या बोल्ड फोटोच्या कॅप्शनमध्ये कृष्णाने लिहिलं, ‘जेव्हा तुमच्या घरी बिर्याणी असेल तर तुम्हाला बाहेरची दाल मखनी का हवी असेल? तू तुझ्या ‘हॉट’ अंदाजात पुन्हा आली आहे. कश्मीरा तुझ्यावर मला खूप अभिमान आहे.’ असे त्याने म्हटले होते.

आता त्यावर कश्मिरा शहाने एक पोस्ट शेयर  केली असून त्यात तिने आपल्या नव-याची पाठराखण केली आहे.  या संदर्भात कश्मीराने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, ‘मला ट्रोल करणारे तेच लोकं आहेत जे आधी मला हसायचे.

कृष्णाने जी काही कमेंट केली त्या मागच्या भावना तर समजून घ्या ना. कृष्णा माझा नवरा असून त्याला माझ्या ज्या गोष्टी आवडतात त्या विषयी तो बोलणारच’ अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे.