PM मोदींच्या 'त्या' सल्ल्याचा परिणाम! 'पठाण'बाबत भाजप नेत्याचा बदलला सूर; गृहमंत्री म्हणाले, आता विरोध..

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण चित्रपट (Pathan Movie) सध्या चांगलाच वादात सापडला आहे.
Pathan Movie Narottam Mishra
Pathan Movie Narottam Mishraesakal
Summary

शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण या हिंदी सिनेमानं पहिल्या दिवशी 54 कोटी रुपयांची कमाई केली.

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण चित्रपट (Pathan Movie) सध्या चांगलाच वादात सापडला आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला हिंदू संघटनांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातही चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळं हिंदुत्ववादी संघटना (Hindu Association) आक्रमक झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडं चित्रपटावर आक्षेप घेणारे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांचा सूर बदलला आहे.

Pathan Movie Narottam Mishra
PM Modi : 'या' कारणासाठी मी मोदींना भेटेन, सरकारनं 'हा' प्रस्ताव पास करावा; असं का म्हणाले रामभद्राचार्य महाराज?

चित्रपटाच्या विरोधाबाबत विचारलं असता ते म्हणाले, चित्रपटाला विरोध होता कामा नये. या चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी काढून टाकण्यात आल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार चित्रपटात बदल करण्यात आला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Pathan Movie Narottam Mishra
Surgical Strike Row: 'सर्जिकल स्ट्राइक'चा वाद पेटला; काँग्रेसनं भाजपकडं मागितला 'हा' पुरावा, सरकारच्या भूमिकेकडं लक्ष

खरंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटांबाबत वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना सल्ला दिला होता. त्यामुळं गृहमंत्री मिश्रा यांनी 'पठाण' विरोधाची आपली भूमिका बदल्याचं बोललं जात आहे.

Pathan Movie Narottam Mishra
Indus Water Treaty : भारत पाकिस्तानचं पाणी रोखणार! सिंधू जल कराराबाबत मोदी सरकारनं धाडली नोटीस

शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण या हिंदी सिनेमानं पहिल्या दिवशी 54 कोटी रुपयांची कमाई केली. एवढे प्रचंड बॉक्स ऑफिस कलेक्शन करून पठाण सिनेमानं केजीएफ 2 आणि वॉर या दोन सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन रेकॉर्डवर मात केली. शाहरूखनं 4 वर्षांच्या गॅपनंतर पठाण सिनेमाच्या निमित्तानं बिग स्क्रीनवर पुनरागमन केलं आहे. पुनरागमन करून शाहरूखनं पहिल्याच सिनेमाच्या माध्यमातून विक्रमी कमाईच्या दिशेनं वाटचाल केल्याचं वृत्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com