Kartik Aaryan: शहजादा फ्लॉप कार्तिकचा 'आशिकी'मधून पत्ता कट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

Kartik Aaryan: शहजादा फ्लॉप कार्तिकचा 'आशिकी'मधून पत्ता कट?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने 2022 मध्ये भूल भुलैया 2 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. भूल भुलैया 2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती, त्यानंतर इंडस्ट्रीतील प्रत्येक निर्मात्याच त्याकडे लक्ष गेलं. भूल भुलैया २ नंतर 'शहजादा'हा चित्रपटगृहात भरपूर पैसे कमावणार असं सर्वांच्या डोक्यात आलं.

मात्र तसं झालं नाही. शहजादाच्या कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर कार्तिक आर्यनबद्दल एक मोठी बातमी समोर आली, असा दावा करण्यात येत होता की, आशिकी 3 च्या निर्मात्यांनी त्याला चित्रपटातुन बाहेर काढलं आहे.

आशिकी 3 च्या निर्मात्यांनी शहजादाची अवस्था पाहून दुसऱ्या अभिनेत्यासोबत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा उमेर संधूने त्याच्या ट्विटमध्ये केला आहे. आशिकी 3 या चित्रपटातून त्याने कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. उमेर संधूच्या या ट्विटपासून सगळेजण म्हणत आहेत की शहजादाने कार्तिक आर्यनचा सुवर्णकाळ संपवलाय त्याचे चाहते मात्र हे ऐकल्यानंतर नाराज झाले आहे.

एका इंग्रजी न्यूज पोर्टंलच्या वृत्तानुसार , उमेर संधूच्या ट्विटमध्ये तथ्य नाही. आशिकी 3 च्या निर्मात्यांनी असं कोणतेही पाऊल उचललेले नाही, ज्यामुळे कार्तिक आर्यनच्या चाहत्यांची निराशा होईल.

निर्माते सध्या आशिकी 3 च्या स्क्रिप्टवर काम करत आहेत आणि लवकरच कार्तिक आर्यनसोबत शूटिंग सुरू करणार आहेत. कार्तिक आर्यनच्या सोबत कोणती अभिनेत्री असेल यावर निर्माते अजूनही विचार करत आहेत. आशिकीच्या दोन्ही पार्टने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आशिकी 3 चित्रपटगृहांमध्येही चांगली कमाई करेल अशी निर्मात्यांना आशा आहे. कार्तिकचे चाहतेही त्याला या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक केले आहेत.

टॅग्स :movieviralkartik aaryan