'मला वाटतं...', महाराजांच्या भूमिकेत अक्षयला पाहून डॉ. अमोल कोल्हे स्पष्टच बोलले Dr. Amol Kolhe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Amol Kolhe Reaction On Akshay Kumar Chhatrapti Shivaji Maharaj Role.

Dr. Amol Kolhe: 'मला वाटतं...', महाराजांच्या भूमिकेत अक्षयला पाहून डॉ. अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

Dr. Amol Kolhe: मराठीतला सध्याचा सगळ्यात मोठा सिनेमा म्हणून महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाकडे पाहिलं जात आहे. सिनेमा लॉंचिग सोहळ्यापासूनच वादात सापडला आहे.

ट्रोलर्स अगदी छोट्या-छोट्या गोष्टीवरनं सिनेमातील चुका काढताना दिसत आहेत. सुरुवातीला मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर याच्या दिसण्यावरनं,हावभावावरनं त्याला खूप बोललं गेलं आणि आता अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावातला लूक समोर आल्यापासून त्याला टीका करून करून झोडपलं जात आहे.

अनेकांना अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आवडलेला नाही. तसं बऱ्याच जणांनी बोलूनही दाखवलं. (Dr. Amol Kolhe Reaction On Akshay Kumar Chhatrapti Shivaji Maharaj Role.)

हेही वाचा: Bollywood: मुलीविषयी रणबीरच्या मनात असुरक्षिततेची भावना; म्हणाला,'माझी मुलगी जेव्हा 20 वर्षांची होईल..'

आता अनेक मालिका,सिनेमांमधून छत्रपती शिवाजी महाराज साकारत जनमानसात प्रसिद्ध झालेल्या खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी एका टी.व्ही वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी अमोल कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार कसा दिसत आहे असे विचारले तेव्हा ते म्हणाले, ''मी गेली चौदा ते पंधरा वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहे. बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं''.

हेही वाचा: Prajakta Mali: गुलाब लाल..आकाश निळं अन् आमची प्राजू..

''एखाद्या अभिनेत्यासाठी केवळ भूमिका महत्त्वाची असते तर एखाद्यासाठी तो त्याचा ड्रीम रोल असू शकतो. माझ्यासाठी एखाद्या भूमिकेला सामोरं जाताना शारिरीक-मानसिक तयारी करून जाणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं ती नैतिक जबाबदारी आहे,असं मी तरी समजतो. इतर कोणी काय करावं,हे एखाद्या मोठ्या अभिनेत्याला मी सांगू शकत नाही''.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

अक्षय कुमारनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमातील फर्स्ट लूक पोस्ट करत,सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं म्हटलं होतं. अक्षयनं पोस्ट केलेल्या व्हिडीओतील त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लूक पाहून अनेक नेटकऱ्यांना तो खटकला. अन् त्याला जोरदार ट्रोल केले जाऊ लागले.