निखळ मनोरंजनाचा प्रयोग...!

निखळ मनोरंजनाचा प्रयोग...!

मनोरंजनाच्या कक्षेबाहेरच्या नाटकांबरोबरच मराठी रंगभूमीवर निखळ मनोरंजन करणाऱ्या कलाकृतीही तितक्‍याच अफलातून साकार झाल्या. याच परंपरेतील प्रा. मधुकर तोरडमल लिखित ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटक साडेचार दशकांपूर्वी रंगभूमीवर आलं. त्यानंतर केवळ शंभर नव्हे, पाचशे नव्हे, तर पाच हजारांहून अधिक प्रयोगांचा विक्रम या नाटकाने नोंदवला. जयसिंगपूरच्या ‘नाट्य शुभांगी’च्या टीमनं याच नाटकाचा प्रयोग यंदाच्या स्पर्धेत सादर करताना निखळ मनोरंजनाच्या प्रयोगाची अनुभूती दिली. 

कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहून अभ्यासापेक्षा उनाडक्‍या करणारे मित्र. प्रत्येक वर्षी नवे पार्टनर मग येथे येतात. काही शिकून पुढे दुसरीकडे जातात आणि वारंवार वाऱ्या करणारे तिथेच राहतात. एका वर्षी ‘मुकुंदा’आणि ‘थत्ते’ हे पार्टनर एकाच रूममध्ये राहू लागतात; मग कुणी लेडीज होस्टेलमधल्या ढमीला तर कुणी आपल्या पूर्वीच्या प्रेयसीला येथे आणण्यासाठी खटपट करू लागतात आणि या साऱ्या खटापटीतून विनोदाची निर्मिती होते.

तो दमदारपणे नाटकातून सादर होतो. पण त्यातील गांभीर्यही तसूभरही कमी होऊ द्यायचे नसते. एकूणच ‘नाट्य शुभांगी’च्या टीमचा हा प्रयोग साऱ्यांनाच खळाळून हसवणारा ठरला. ‘नाट्य शुभांगी’चं नाटक म्हटलं, की या परिवारातले सदस्य नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असले, तरी हमखास जयसिंगपुरात येतात. नाटक अधिक चांगलं होण्यासाठी योगदान देतात आणि हा सारा परिवार प्रत्यक्ष प्रयोगावेळीही एकवटतो. यंदाही त्याची प्रचिती या टीमनं दिली. 

 दिग्दर्शक : शिरीष यादव  नेपथ्य : विलास जाधव, रमेश यळगुडकर
 प्रकाशयोजना : राजेश पाटील, रवींद्र ताडे  पार्श्वसंगीत : भरत खिचडे, राजेश जाधव, अरिहंत शिरगावे  वेशभूषा : प्रमोद कुलकर्णी, दीपक अणेगिरीकर, संदीप जाधव  केशभूषा : स्नेहल कुलकर्णी, विश्वास माळी,  रंगभूषा : इलाई खलिफा  रंगमंच व्यवस्था : सचिन पाचोरे, रंजन कुलकर्णी, संग्राम पाटील, सचिन कोरीशेट्टी  सूत्रधार : सुभाष टाकळीकर

पात्रपरिचय
 ओंकार कुलकर्णी (बंड्या), निखिल अणेगिरीकर (प्यारे), अजित बिडकर (कुंदा), सुधीर कुलकर्णी (थत्ते),  हरिप्रिया जोशी (ढमी), रोहिणी पाटील (प्रा. देशपांडे बाई), कुमार हत्तळगे (डेप्युटी), विश्वजित इंगवले (विद्यार्थी), प्रेम कोळी (हमाल), अशोक कोकणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com