अन्‌ ड्रीम कार गिफ्ट मिळाली!

file photo
file photo

‘पवित्र रिश्‍ता’ मालिका करत असताना त्या सेटवर मी नवीनच होते. इतर कलाकार आधीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने बऱ्याच लोकांकडे गाड्या होत्या. एकत्र फिरायला जायचो तेव्हा मलाही कुठेतरी वाटायचं, की माझ्याकडे स्वतःची कार असावी. तेव्हाच मी कार घ्यायचे ठरवले आणि पहिली सेकंड हॅन्ड कार घेतली ती म्हणजे ह्युदांईची ‘आय १०’.

‘आय १०’ घेतल्यानंतरच मी गाडी चालवायला शिकले. त्याच्यानंतर एक चित्रपट करत असताना फोर्डची ‘इकोस्पोर्टस’ ही गाडी घेतली. ही माझी पहिली नवीकोरी गाडी होती. लग्नाआधी मी बडोद्यामध्ये राहत होते. तेव्हा माझ्या बाबांकडेदेखील गाडी होती. पण ती गाडी जास्त चालवू शकले नाही. मुंबईमध्ये राहायला आले आणि गजबजलेल्या शहरात मी गाडी चालवू लागले. तेव्हा माझ्या बाबांनी खूप कौतुक केलं होतं. माझ्या एका गाडीवर माझं खूपच प्रेम होतं. ती म्हणजे टोयोटा कंपनीची ‘फॉर्च्युनर’ गाडी. माझ्या या गाडीचा अपघात झाला होता. तो एवढा मोठा होता की ती गाडी दुरुस्त होण्यासारखीदेखील राहिली नव्हती. माझं त्या गाडीवर खूप प्रेम असल्याने मी तशीच नवीन ‘फॉर्च्युनर’ विकत घेतली.

मी केसी महाविद्यालयात असताना आम्ही मरिन लाईन्सला फिरायला जायचो. एकदा आम्ही फिरत असताना तेथून ‘जॅग्वार’ ही गाडी जात होती. त्याच क्षणाला मला ती कार इतकी आवडली आणि ती माझ्याजवळ असावी, असं स्वप्न होतं. सहा महिन्यांपूर्वी मला माझ्या नवऱ्याने ‘जॅग्वार’ गाडी गिफ्ट केली. मी खूप आनंदी आहे की माझी ड्रीमकार माझ्याजवळ आहे.
                             शब्दांकन : स्नेहा गांवकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com