Drishyam 2: तगडी स्टारकास्ट आणि कोटींचे मानधन! जाणून घ्या कुणी घेतले किती पैसे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drishyam 2 star cast tabu to ajay devgn charge fees for movie

Drishyam 2: तगडी स्टारकास्ट आणि कोटींचे मानधन! जाणून घ्या कुणी घेतले किती पैसे..

Drishyam 2: ज्या अभिनेत्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत त्या अजय देवगणचा 'दृष्यम 2' आज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, अखेर तो दिवस आज उजाडला आहे. तगडी स्टारकास्ट, प्रभावी अभिनय, आणि दमदार संवाद असलेल्या 'दृष्यम 2' या बिग बजेट चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन आकारले आहे ते जाणून घेऊया..

(Drishyam 2 star cast tabu to ajay devgn charge fees for movie)

हेही वाचा: Anu Aggarwal: 'इंडियन आयडल 13' वादात! 'आशिकी' फेम अनु अग्रवालचे निर्मात्यांवर गंभीर आरोप

अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'दृश्यम' या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आज त्याचा दूसरा भाग म्हणजेच 'दृश्यम 2' प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बूम अक्षय खन्ना, श्रेया सरन, इशिता दत्ता अशी दमदार कास्ट आहे. या बिग बजेट सिनेमासाठी कलाकारांनीही तसेच दमदार मानधन आकारले आहे.

हेही वाचा: Hemant Dhome Post: 'क्षिती आणि माझं दुसरं बाळ…',' हेमंत ढोमेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगनने या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. तर अभिनेत्री तब्बूने या 3.5 कोटी मानधन घेतलं आहे. या चित्रपट अजयच्या पत्नीची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री श्रेया सरनने साकारली आहे. दृश्यम-2 साठी श्रेयाने 2 कोटी मानधन घेतलं आहे.

अभिनेता अक्षय खन्ना देखील या चित्रपटाट महत्वाच्या भूमिकेत असून त्याने 2.5 कोटी मानधन घेतलं आहे. तर अभिनेत्री ईशिता दत्तानं या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने 1.2 कोटी मानधन घेतलं आहे.

'सत्याला तुम्ही कितीही पराजित करण्याचा प्रयत्न केला तरी ते काही पराजित होत नाही. याउलट ते वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यत ते येतेच. दृष्य़म 2 मध्ये मीरा देशमुखचा प्रवास अजुनही सुरु आहे. तिला काही केल्या आपल्या मुलाचा खुनी शोधायचा आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. मात्र यासगळ्यात ज्यानं हे काम केले आहे त्याच्यापर्यत पोहचुनही ती तोच गुन्हेगार आहे हे सिद्ध करु शकत नाही. मीराला ही गोष्ट सतावणारी आहे' असा कथाभाग या चित्रपटाचा आहे.

टॅग्स :Bollywood NewsAjay Devgn