'क्षिती आणि माझं दुसरं बाळ…',' हेमंत ढोमेच्या पोस्टनं वेधलं लक्षHemant Dhome Post For 'Sunny',Hemant Dhome | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Dhome Post for his' Sunny' Movie, Marathi Movie

Hemant Dhome Post: 'क्षिती आणि माझं दुसरं बाळ…',' हेमंत ढोमेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Hemant Dhome Post: हेमंत ढोमे हा उत्तम नट आहेच पण त्याहूनअधिक उत्तम त्याची लेखणी अन् त्याचं दिग्दर्शन आहे असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंतचे त्याचे सिनेमे पाहिले तर त्यानं अभिनय केलेल्या सिनेमांपेक्षा त्यानं दिग्दर्शित केलेले,लिहिलेले अन् सोबत निर्मितीची धुरा सांभाळलेले त्याचे सिनेमे बॉक्सऑफिसवर अधिक कमाई करुन गेले. त्याच्या 'झिम्मा' सिनेमानं तर अनेक रेकॉर्ड केलेले आपण पाहिले असेलच. (Hemant Dhome Post for his' Sunny' Movie, Marathi Movie)

हेही वाचा: Shiv Thakare Romantic Photo:काळोखात गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसला शिव,'ते' फोटो पाहून चाहते हैराण

आपल्या अभिनयातून विनोदाची फोडणी देणारा हेमंत अनेकदा बोलताना,लिहिताना वैचारिक पातळीवर अफाट ज्ञान आपल्या गाठी बांधून आहे असं आवर्जुन जाणवतं. सध्या तो त्याच्या 'सनी' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. १८ नोव्हेंबर रोजी हेमंत ढोमेचा 'सनी' सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. त्यानिमित्तानं हेमंतने एक पोस्ट केलीय जिनं सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं आपली पत्नी आणि अभिनेत्री क्षिती जोगसोबत एक क्युट फोटो पोस्ट केला आहे. आणि सोबत लांबलचक नोट लिहिली आहे. त्यानं यामाध्यमातून आपल्या मायबाप प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. काय म्हणाला आहे हेमंत त्या पोस्टमध्ये,चला जाणून घेऊया सविस्तर...

हेही वाचा: Janhvi Kapoor Home: जान्हवीला बाथरुमचा दरवाजा बंद करु द्यायची नाही आई,चेन्नईचं 'ते' घर दाखवत म्हणाली..

हेमंतनं आपल्या सनी सिनेमाच्या निमित्तानं केलेल्या त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''सनी…

क्षिती आणि माझं दुसरं बाळ…आमच्या पहिल्या बाळाला म्हणजे झिम्मा ला तुम्ही बोर्डात आणलंत, भरभरून प्रेम दिलंत, त्याला डोक्यावर घेतलंत…

सनी हे आमचं बाळ थोडं हट्टी आहे, द्वाड आहे, प्रचंड मस्तीखोर आहे पण खूप जास्त प्रेमळ आहे…आणि आम्हाला खात्री आहे, ते तुम्हा प्रेक्षकांचं बोट धरून मोठं होणार… त्याला सांभाळुन घ्या!उद्यापासुन आमचं कारटं तुमच्या भेटीला येतंय…तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असुदे...''. हेमंत ढोमेने या पोस्टसोबत आपली पत्नी अभिनेत्री क्षिती जोगसोबतचा एक क्युट फोटो पोस्ट केला आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' सिनेमात मराठीतला हॅन्डसम हंक ललित प्रभाकर मध्यवर्ती भूमिकेत आहे. सिनेमा लंडनमध्ये देखील शूट करण्यात आला आहे. घरापासून दूर राहणाऱ्या अनेकांसाठी हा सिनेमा असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची टीम सांगताना दिसत आहे. या सिनेमात क्षितीने देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे. हेमंतने 'सनी' संदर्भात केलेल्या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यात मिताली मयेकरच्या कमेंटचा आवर्जुन उल्लेख करायला हवा,कारण तिने लिहिलय, 'मी उत्सुक आहे तुमच्या कारट्याला पहायला...'