esakal | 'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन झाली आई
sakal

बोलून बातमी शोधा

Shriya Saran

व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना सांगितली 'गोड बातमी'

Shriya Saran |'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन झाली आई

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री श्रिया सरन Shriya Saran हिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रियाच्या गरोदरपणाची चर्चा होती. आता तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आई झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. श्रियाने ११ ऑक्टोबर रोजी तिच्या इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला. श्रियाने २०१८ साली राजस्थानमध्ये अँड्रे कोशिवशी Andrei Koscheev लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाबाबत इंडस्ट्रीत फार कोणाला माहित नव्हतं. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत श्रिया आणि अँड्रेने लग्न केलं होतं.

लग्नानंतर पतीसोबत श्रिया स्पेनमध्ये राहत होती. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोघं भारतात परतले. '२०२० या वर्षातील क्वारंटाइन आमच्यासाठी सर्वांत सुंदर होतं. आमचं जग पूर्णपणे बदललं. आमच्या आयुष्यात चिमुकल्या परीचं आगमन झालं. आम्ही दोघं देवाचे आभारी आहोत', असं कॅप्शनमध्ये लिहित श्रियाने चाहत्यांना गोड बातमी सांगितली.

हेही वाचा: BBM 3: सूत्रसंचालनासाठी महेश मांजरेकरांना मिळतं इतकं मानधन

अँड्रे हा रशियन टेनिसपटू आणि उद्योजक आहे. लॉकडाउनदरम्यान श्रिया आणि अँड्रे हे बार्सिलोनामध्ये होते. ऑगस्टमध्ये भारतात परतल्यानंतर श्रियाच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू झाल्या. श्रिया आणि अँड्रे यांची पहिली भेट मालदिव्समध्ये झाली होती. त्यावेळी श्रिया अभिनेत्री असल्याचं अँड्रेला माहित नव्हतं. 'दृश्यम' या चित्रपटात श्रियाने अजय देवगणसोबत भूमिका साकारली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये श्रिया ही नामांकित अभिनेत्री आहे.

loading image
go to top