Drishyam Hollywood Remake : तमिळ, हिंदी नंतर आता हॉलीवूडमध्ये होणार अजयच्या 'दृष्यम'चा रिमेक! मेकर्सनं दिली गुड न्यूज

प्रसिद्ध बॉलीवूडपट दृष्यमच्या बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होती.
Drishyam Hollywood latest news
Drishyam Hollywood latest news

Drishyam Hollywood Remake : साऊथच्या दृष्यमनं चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ निर्माण केली होती. त्यानंतर या चित्रपटाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये (Drishyam Movie News) रिमेक झाले होते. हिंदीमधील देखील त्याचे दोन पार्ट प्रदर्शित झाले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता दृष्यमच्या मेकर्सनं चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

अजय देवगणचा दृष्यमवर आता हॉलीवूडचे मेकर्स चित्रपट तयार करणार आहेत. अशी बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेनं याबाबत सविस्तर वृत्त (Drishyam Latest News) दिलं आहे. याबाबत पनोरमा स्टुडिओजनं गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि जॉट फिल्मसोबत करार केल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध चित्रपटाचा इंग्रजीमध्ये रिमेक होतो आहे यामुळे दृष्यमच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दृष्यम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे ज्याच्या हॉलीवूड रिमेक होतो आहे असं सांगण्यात येत आहे. यापूर्वी बऱ्याचशा भारतीय चित्रपटांचे इंग्रजीमध्ये डबिंग करण्यात आले आहे. मात्र रिमेकचा मान दृष्यमला मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मेकर्सच्या आनंदाला उधाण आले आहे. दृष्यम चित्रपटाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

दृष्यमची लोकप्रियता ही केवळ भारतातच नसून चीन आणि अमेरिकेमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी या चित्रपटाचा कोरिअन रिमेक झाला असून तो चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आता मेकर्सनं या चित्रपटाचा हॉलीवूडमध्ये रिमेक होणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारतीय चित्रपट विश्वात आणखी एक मानचा तुरा या निमित्तानं खोवला गेला आहे.

Drishyam Hollywood latest news
Ranveer Singh: रणवीर सिंग पुढील वर्षी करणार ‘शक्तिमान’चे चित्रीकरण

असं म्हटलं जात आहे की, हॉलीवूड रिमेक व्हर्जन सोबत या चित्रपटाचं स्पॅनिशमध्येही डबिंग केलं जाणार आहे. दृष्यमच्या बाबत बोलायचं झाल्यास या चित्रपटाच्या मुळ मल्याळम भाषेतील दृष्यमचा पहिला भाग १९ डिसेंबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

याबाबत पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी या नव्या कराराविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, दृष्यम ही अशी कलाकृती आहे जी जगभरातील अनेक सिनेमाप्रेमींना खिळवून ठेवेल. त्यामुळे आता ती आपल्या प्रादेशिक सीमा ओलांडत साता समुद्रपार गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com