esakal | ड्रग्ज प्रकरण: मुंबई कोर्टाने फेटाळला अरमान कोहलीचा जामिन अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

arman kohli

ड्रग्ज प्रकरण: मुंबई कोर्टाने फेटाळला अरमान कोहलीचा जामिन अर्ज

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ड्रग्ज प्रकरणात Drugs Case अटकेत असलेल्या अभिनेता अरमान कोहलीचा Armaan Kohli जामीन अर्ज मुंबई न्यायालयाने फेटाळला आहे. अरमानच्या घरी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) NCB छापा मारून त्याला अटक केली होती. एनसीबीने त्याच्या घरातून कोकेन हा अमली पदार्थ हस्तगत केला होता. दक्षिण अमेरिकेतून कोकेनची तस्करी करण्यात आल्याचे एनसीबीच्या तपासातून स्पष्ट झालं आहे. एनडीपीएस न्यायालयाने बुधवारी अरमानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अरमानने मुंबई न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळला आहे.

अरमान कोहलीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर एनसीबीने त्याची रिमांड मागितली नाही. त्यानंतर कोहलीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. कोहलीविरोधात ड्रग्ज सेवनासाठी कारवाई व्हावी की ड्रग्ज सप्लाय नेटवर्कचा भाग बनण्यासाठी, हे एनसीबी त्यांच्या चार्जशीटमध्ये स्पष्ट करणार आहे. दक्षिण अमेरिकेतून कोकेन पुरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन नायजेरियन नागरिकांसह पाच जणांना अटक केली आहे.

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त ऐकून चाहती गेली कोमात

पोलिसांनी अजय राजू सिंग नावाच्या ड्रग्ज तस्कऱ्याला अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान अरमानचं नाव समोर आलं. त्यानंतर एनसीबीने अरमानच्या घरी छापा मारून कोकेन हा अमली पदार्थ हस्तगत केला.

ड्रग्ज प्रकरणात याआधीही अनेकांना अटक झाली आहे. बॉलिवूडच्या ए-ग्रेड कलाकारांशिवाय टीव्ही कलाकारांवरदेखील पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणाचा तपास कसून केला जात आहे. या अगोदर एजाज खानचीदेखील चौकशी करण्यात आली होती. त्याला अटकही करण्यात आली होती. त्याच्या चौकशीदरम्यान अनेकांची नावं समोर आली. एजाजच्या चौकशीत अभिनेता गौरव दीक्षितचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने त्याच्या घरी धाड टाकली.

loading image
go to top