esakal | सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त ऐकून चाहती गेली कोमात
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Shukla

सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त ऐकून चाहती गेली कोमात

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे Sidharth Shukla हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी सिद्धार्थसारख्या कलाकाराचा अकाली ओढवलेला मृत्यू त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सहकलाकारांनाही चटका लावून जाणारा ठरला. सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त ऐकून त्याची एक चाहती कोमात गेल्याची माहिती समोर येत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये डॉक्टर जयेश ठाकरची पोस्ट पहायला मिळतेय. 'मित्रांनो, आपल्या कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत बोला, एकटे राहू नका. नुकतीच 'सिदनाझ'ची एक चाहती बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत सापडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वत:ची काळजी घ्या आणि तिच्यासाठी प्रार्थना करा', असं या पोस्टमध्ये लिहिलंय. सिद्धार्थ शुक्ला आणि त्याची मैत्रीण शहनाज गिल यांना चाहत्यांनी 'सिदनाझ' असं नाव ठेवलं होतं. सिद्धार्थची ही चाहती अंशत: कोमात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा: 'खबरी बनू नका'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर सेलिब्रिटींवर भडकली गौहर खान

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कार विधीसाठी अभिनेत्री शहनाज गिल ओशिवरा स्मशानभूमीत पोहोचली होती. यावेळी शहनाजसोबत तिचा भाऊ होता. शहनाज तिच्या गाडीत रडताना दिसली. शहनाजला सिद्धार्थच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी देखील ओशिवरा स्मशानभूमीत हजेरी लावली होती. यामध्ये अली गोनी, असिम रियाज, राहुल महाजन, संभावना सेठ, विकास गुप्ता, अभिनव शुक्ला, करणवीर बोहरा, शेफारी जरीवाला यांचा समावेश होता.

निधनाची बातमी ऐकताच तरुणीला कोसळलं रडू!

सिद्धार्थच्या निधनानंतर आणखी एका चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तरुणी सिद्धार्थसाठी रडताना दिसत होती. सिद्धार्थचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

loading image
go to top