जॅकलिन फर्नांडिस : ९-९ लाखांच्या तीन मांजरी, मिनी कूपर अन् रोलेक्स घड्याळ | Bollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez

जॅकलिन फर्नांडिस : ९-९ लाखांच्या तीन मांजरी, मिनी कूपर अन् रोलेक्स घड्याळ

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली असून, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिनची 7 कोटी 12 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये 200 कोटींच्या फसवणुकीमुळे अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून मिळालेली महागड्या भेटवस्तूंचा समावेश असून, जप्त केलेल्या संपत्तीपैकी जॅकलिनच्या 7.12 कोटींच्या फिक्स डिपॉझिटचा समावेश आहे. 36 वर्षीय जॅकलीन ही श्रीलंकेची नागरिक असून या प्रकरणी ईडीने तिची अनेकदा चौकशी केली आहे.

या प्रकरणी गेल्या वर्षी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तीन पर्शियन मांजरी मिळाल्या होत्या, त्या प्रत्येकाची किंमत सुमारे 9 लाख रुपये होती. याशिवाय एक अरबी घोडा होता ज्याची किंमत 52 लाख रुपये आहे. याशिवाय जॅकलिनला मिनी कूपर सुद्धा भेट म्हणून देण्यात आली होती. पण तिने ती परत केली असे मानले जाते.

या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तपास यंत्रणेने म्हटले आहे की, जॅकलीनला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, ज्याची कबुली सुकेशने एजन्सीसमोर चौकशीदरम्यान दिली आहे. कथित भेटवस्तूंच्या यादीमध्ये या विदेशी आणि महागड्या वस्तूंचा समावेश आहे.

भेटवस्तू कोणत्या

1. तीन पर्शियन मांजरींची प्रत्येकी किंमत 9-9 लाख रुपये.

2. 52 लाखांचा अरबी घोडा

3. डायमंड सेट, 15 जोडी कानातले

4. महागडी क्रॉकरी

5. महागड्या Gucci बॅग

6. जिममध्ये घालण्यासाठी दोन Gucci कपडे

7. लुई व्हिटॉन शूजच्या काही जोड

8. दोन हर्मीस ब्रेसलेट

9-. एक मिनी कूपर कार

10. रोलेक्स घड्याळ

Web Title: Ed Raid On Jacqueline Fernandez Persian Cat Mini Cooper List Of Gifts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top