Sumeet Raghvan Birthday: मुलांच शिक्षण मराठी मिडीयममध्येच! सुमित राघवनने जपलंय मराठीपण

सुमित उत्कृष्ट अभिनेता आहेच शिवाय त्याने त्याच्या कुटुंबामध्ये मराठीपण जपलंय.
sumeet raghvan, sumeet raghvan birthday, sumeet raghvan birthday news, sumeet raghvan family, sumeet raghvan wife
sumeet raghvan, sumeet raghvan birthday, sumeet raghvan birthday news, sumeet raghvan family, sumeet raghvan wifeSAKAL

Sumeet Raghvan News: फास्टर फेणे मालिकेतून बालकलाकार म्हणून सुमितने अगदी लहान वयात स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली. सुमितने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या.

सुमितचा अभिनय, त्याची भाषा, त्याची संवादफेक अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना भावतात. सुमित उत्कृष्ट अभिनेता आहेच शिवाय त्याने त्याच्या कुटुंबामध्ये मराठीपण जपलंय.

(Education of children only in Marathi medium! marathi actor Sumit Raghavan has preserved Marathi)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सुमित आणि त्याची बायको चिन्मयी यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात चर्चेत असते. हे दोघेच नवरा - बायको विविध विषयांवर त्यांच्या भूमिका मांडत असतात. सध्याच्या जगात अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी मिडीयममध्ये दाखल करण्यासाठी उत्सुक असतात.

अनेक मराठी पालक सुद्धा आपल्या मुला - मुलींना इंग्रजी माध्यमात प्रवेश मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करत असतात.

या धावत्या जगात सुमित आणि चिन्मयी या दोघांनी त्यांच्या मुलांसाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.

सुमित आणि चिन्मयी या दोघांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमातल्या शाळेत शिकवलं आहे. आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना शिकवणे हे पालकांना स्टेटस सिम्बॉल वाटतं. यासाठी पालक अगदी कर्ज काढून मुलांना इंग्रजी माध्यमातल्या शाळेत दाखल करतात.

सुमितची आर्थिक परिस्थिती तशी चांगली आहे. परंतु तरीही सुमित आणि चिन्मयी या दोघांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला.

मराठी माध्यमात शिकूनही मुलं प्रगती करू शकतात याचा सुमित आणि चिन्मयी यांना ठाम विश्वास आहे.

sumeet raghvan, sumeet raghvan birthday, sumeet raghvan birthday news, sumeet raghvan family, sumeet raghvan wife
Salman Khan - Aamir Khan: ईद निमित्ताने सलमान - आमीर एकत्र.. फॅन्सना आली 'अंदाज अपना अपना' ची आठवण
sumeet raghvan, sumeet raghvan birthday, sumeet raghvan birthday news, sumeet raghvan family, sumeet raghvan wife
Ashvini Bhave.. आजही लिंबू कलरची साडी पाहिली तर तुम्हीच आठवता मॅडम..!

गेल्या अनेक महिन्यांपासून आरे मध्ये मेट्रो कारशेड होणार अशी चर्चा सुरु आहे. त्या दरम्यान सुमितने काही महिन्यांपूर्वी आंदोलकांना मारतानाचा व्हिडिओ शेयर केला होता,

''आरेच्या आंदोलकांसोबत आपणही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले आहेत, बोगस फालतू लोक. कामाचे ना कामाचे, ना धामाचे.''

असं म्हणत सुमीतनं आरे आंदोलकांवर टीका केली होती. सुमितने आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात साकारली डॉ. श्रीराम लागूंची भूमिका लोकप्रिय ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com