ड्रग्ज प्रकरण : तुरुंगात असलेला अभिनेता एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह 

eijaz khan
eijaz khan

ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता एजाज खान याला तुरुंगात कोरोनाची लागण झाली. एजाजचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांनीही स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. एजाजला एनसीबीने मंगळवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं होतं. 

गेल्या आठवड्यात एनसीबीने शादाब बटाटा या ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली होती. चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे विविध ड्रग्ज उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशीतून अभिनेता एजाजचं नाव पुढे आलं होतं. मंगळवारी राजस्थानहून मुंबई विमानतळावर उतरताच एजाजला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं. एनसीबीच्या विभागीय कार्यालयात तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर एजाजला अटक करण्यात आली. 

हेही वाचा : अक्षय कुमारनंतर 'रामसेतू'च्या सेटवरील ४५ ज्युनिअर आर्टिस्ट कोरोना पॉझिटिव्ह

 ड्रग्जप्रकरणी एजाजचं स्पष्टीकरण
"माझ्या घरात चार झोपेच्या गोळ्या आढळल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला होता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी ती झोपेच्या गोळ्या घेत आहे", असं स्पष्टीकरण एजाजने एनसीबीला दिलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com