esakal | खरी बंदूक हातात घेण्याचा अनुभव शहारे आणणारा- अनुजा साठे
sakal

बोलून बातमी शोधा

anuja sathe

"खरी बंदूक हातात घेण्याचा अनुभव शहारे आणणारा"

sakal_logo
By
स्वाती वेमूल

हातात खरी बंदूक घेऊन चालवणे, किती भीतीदायक असू शकते, याची आपल्याला तितकीशी कल्पना नाही. अनेक देशभक्ती किंवा गँगवॉरवर आधारित चित्रपटांमध्ये आपण गुंडांना किंवा दहशतवाद्यांना अगदी सहजरित्या गोळीबार करताना, रक्तपात घडवताना पाहतो. ते पाहण्यात आपण इतके तल्लीन होऊन जातो की, ते सर्व खोटे आहे हेही आपण पूर्णपणे विसरतो. इतक्या कौशल्याने हे चित्रित केले जाते. एमएक्स प्लेअर ओरिजनलच्या 'एक थी बेगम २' Ek Thi Begum 2 या वेब सीरिजची नायिका अनुजा साठे Anuja Sathe हिने पडद्यावर अतिशय सहजरित्या बंदूक हाताळली आहे. अर्थात त्यासाठी तिने प्रशिक्षण घेतले आहे.

बंदूक हाताळण्याच्या अनुभवाबद्दल अनुजा साठे म्हणते, ''आयुष्यात पहिल्यांदा हातात जेव्हा मी बंदूक घेतली होती, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही. 'एक थी बेगम २' मधील माझ्या भूमिकेची गरज म्हणून मी बंदूक हाताळली, तो अनुभव खूपच दडपण आणणारा आणि भीतीदायक होता. परंतु जेव्हा तुम्ही सूडाच्या भावनेने जेव्हा पेटलेले असता, तेव्हा हे सर्व नगण्य होऊन जाते. शूटिंगच्या सेटवर बंदूक चालवण्याअगोदर मी प्रशिक्षण घेतले होते, ज्याचा मला निश्चितच फायदा झाला.''

एक थी बेगमच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात लीला पासवानच्या शोधाने सुरु होते. मृत्यूचे सोंग घेतलेली अशरफ दुबईचा डॉन मकसूदला (अजय गेही) संपवण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावते. आपला पती झहीरच्या (अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेवर ती ठाम राहते. अशरफ स्वतःला गुन्हेगारी जगतात झोकून देते.

हेही वाचा: माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित 'एक थी बेगम'च्या दुसऱ्या सीझनमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसाटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णानदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एमएक्स प्लेअर ओरिजनलची 'एक थी बेगम २' ही वेब सीरिज प्रेक्षकांना ३० सप्टेंबरपासून विनामूल्य पाहता येईल.

loading image
go to top