Ekda Yeun Tar Bagha: रहस्यमयी कथानकाला कॉमेडीचा तडका, 'एकदा येऊन तर बघा'चा धम्माल ट्रेलर एकदा पाहाच!

ओंकार भोजने - प्रसाद खांडेकरचा धम्माल कॉमेडी सिनेमा एकदा येऊन तर बघाचा ट्रेलर भेटीला आलाय
ekda yeun tar bagha movie trailer out now prasad khandekar tejaswini pandit onkar bhojane
ekda yeun tar bagha movie trailer out now prasad khandekar tejaswini pandit onkar bhojaneSAKAL

Ekda Yeun Tar Bagha Trailer News: गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन विषयाचे सिनेमे पाहायला मिळाले. बाईपण भारी देवा, महाराष्ट्र शाहीर, वेड अशा अनेक सिनेमांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या आत्मपॅफ्लेट आणि नाळ भाग २ सिनेमानेही प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. अशातच नवीन मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे एकदा येऊन तर बघा. एकदा येऊन तर बघा सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय.

ekda yeun tar bagha movie trailer out now prasad khandekar tejaswini pandit onkar bhojane
Kadak Singh Trailer: अंगावर काटा आणणारा पंकज त्रिपाठींच्या 'कडक सिंग' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?

एकदा येऊन तर बघाचा ट्रेलर

एकदा येऊन तर बघा सिनेमाचा धम्माल ट्रेलर भेटीला आलाय.या ट्रेलरमध्ये फुलंब्रीकर कुटूंब दिसतं. जे एकदा येऊन तर बघा नावाचं हॉटेल सुरु करतं. या कुटूंबाच्या हॉटेलमध्ये जो पहिला गिऱ्हाईक येतो त्याचा अज्ञात कारणामुळे जीव जातो.

पुढे त्याचा मृतदेह लपवण्यात या कुटुंबाची तारांबळ उडते. आणि पुढे जी काय धम्माल उडते, हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. ट्रेलरच एवढा मजेशीर आहे तर सिनेमाही नक्कीच पोट धरुन हसायला लावणार, यात शंका नाही.

दिग्गज कलाकारांची फौज

एकदा येऊन तर बघा सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ कदम, वनिता खरात, रोहित माने असे कलाकार आहेत.

या सिनेमाचं लेखन - दिग्दर्शन प्रसादने केलं असुन स्वतः प्रसाद खांडेकर सुद्धा सिनेमात भुमिका साकारणार आहे.

या तारखेला सिनेमा होणार रिलीज

एकदा येऊन तर बघा सिनेमा ८ डिसेंबरला भेटीला येणार आहे. हा सिनेमा आधी २४ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. पण आता हा सिनेमा ८ डिसेंबरला भेटीला येणार आहे.

फुलंब्रीकर कुटुंब २०२३ च्या अखेरीस प्रेक्षकांना पोट धरुन खळखळुन हसवणार, यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com