एकता कपूरची मोठी डील; तब्बल 50 कोटी रुपयांना घेतले वितरण हक्क 

संतोष भिंगार्डे
Sunday, 26 July 2020

गेले काही दिवस एकता कपूर व पूजा एण्टरटेन्मेंटशी चर्चा सुरू होती. अखेर 50 कोटी रुपयांना एकताने वितरणाचे हक्क विकत घेतले आहे.

मुंबई ः एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट ओटीटीवर जात असताना डेव्हिड धवन दिग्दर्शित कुली नं. 1 हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बालाजी टेलिफिल्मची सर्वेसर्वा एकता कपूरने या चित्रपटाचे वितरणाचे हक्क विकत घेतले आहेत. 

गतीमंद बालसुधारगृहातील कोरोना बाधितांवर 'या' रुग्णालयांमध्ये उपचार सुरू; 29 व्यक्तींना झाली लागण

गेले काही दिवस एकता कपूर व पूजा एण्टरटेन्मेंटशी चर्चा सुरू होती. अखेर 50 कोटी रुपयांना एकताने वितरणाचे हक्क विकत घेतले आहे. डेव्हिड धवन यांनी गोविंदा व करिश्मा कपूरला घेऊन सन 1995 मध्ये कुली नं. 1 हा चित्रपट बनविला होता. तद्दन मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. गोविंदा, करिश्मा कपूर व कादर खान या त्रिकुटाने धमाल उडविली होती. आता त्याच्याच रिमेक डेव्हिड धवन यांनी बनविला आहे. 

मुंबईत लोकल सेवा सुरु होणार?, पालिका आयुक्तांनी घातली 'ही' अट

डेव्हिड धवन यांनी आपला मुलगा वरुणला घेऊन हा चित्रपट बनविला आहे. वरुण आणि सारा अली खान ही जोडी या चित्रपटात धमाल करणार आहे. वरुण आणि साराचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असून त्यात परेश रावल, राजपाल यादव, जावेद जाफरी यांसारखे इतर कलाकारही आहेत.भारतात चित्रपट वितरणासाठी बालाजीने जवळपास 50 कोटी रुपये घेतले आहेत. हा करार कोरोना महामारीच्या आधी झाला होता,असे समजते. 
---

संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ekta kapoor buys distribution rights in 50 crore for coolie no 1