'बालाजी'च्या कर्मचाऱ्यांसाठी एकता कपूरच ठरलंय; घेतला सर्वांत माेठा निर्णय

'बालाजी'च्या कर्मचाऱ्यांसाठी एकता कपूरच ठरलंय; घेतला सर्वांत माेठा निर्णय

मुंबई : कोरोना विषाणूविरोधातील लढाई सध्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. देशात कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारही रात्रंदिवस कोरोना विषाणूशी दोन हात करत आहे. सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सारेच जण कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सरकारला मदत करत आहे. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कलाकारांनी आतापर्यंत लाखो रुपये दान केले. तसेच काही जण तळहातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी देवदूत बनले आहेत. आता निर्मिती एकता कपूरही आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे. बालाजी टेलिफिल्मसमध्ये एकताला मिळणारा वर्षभराचा पगार ती तिच्या कामगारांसाठी दान करणार आहे.
 
एकताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. बालाजी टेलिफिल्म्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. सध्या चित्रीकरण पूर्णपणे ठप्प असल्याने त्यांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. मी माझा वर्षभराचा पगार म्हणजेच 2.5 कोटी रुपये माझ्या कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात माझ्या कर्मचाऱ्यांना कोणतीच अडचण आणि आर्थिक चणचण भासू नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थिती एकत्र येऊन लढणं हा एकच पर्याय आहे. असे एकता कपूरने म्हटले आहे. तसेच सर्वांनी घरीच रहा, सुरक्षित राहा असे आवाहनही तिने लोकांना केले आहे.
 
कला विश्वातील मंडळी देशावर ओढावलेल्या या कठीण प्रसंगामध्ये सढळ हाताने मदत करताना दिसत आहेत. प्रत्येक जण आपल्या कर्मचाऱ्यांनी काळजी घेत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कलाकारांनी केलेल्या मदतीमुळे थोडाफार दिलासा मिळालेला आहे. सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, विकी कौशल, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, करिना कपूर, आयुष्मान खुराणा, अजय देवगण यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी आपापल्या परीने आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

लॉकडाऊनमध्ये मिळणार माधुरीकडून डान्स शिकण्याची संधी..

मिलिंद सोमनची 81 वर्षीय आई घालतेय लंगडी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com