प्रसिद्ध लेखिका पद्मा सचदेव यांचे निधन, लता दिदींकडून शोक व्यक्त

आपल्या साहित्यानं भारतीय वाचकांना समृद्ध करणाऱ्या लेखिका पद्मा सचदेव (padma sachdev) यांचे निधन झाले आहे.
padma sachdev
padma sachdev

मुंबई - आपल्या साहित्यानं भारतीय वाचकांना समृद्ध करणाऱ्या लेखिका पद्मा सचदेव (padma sachdev) यांचे निधन झाले आहे. एक कवयित्री आणि कादंबरीकार म्हणून त्या साहित्यविश्वात परिचित होत्या. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी शोक व्यक्त केला आहे. दिदींनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे. डोगरी भाषेत साहित्य निर्मिती करणाऱ्या पहिल्या आधुनिक महिला कवी अशीही सचदेव यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या जाण्यानं भारतीय साहित्य सृष्टीची मोठी हानी झाली आहे.

पद्मा सचदेव यांनी हिंदी भाषेत देखील लिखाण केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखणीनं त्यांनी वाचकांची पसंती मिळवली होती. त्या एक वाचकप्रिय साहित्यिक होत्या. लेखिकेचे भाऊ ज्ञानेश्वर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी आल्या होत्या. मात्र अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. डोगरी भाषेतील पहिल्या आधुनिक महिला कवयित्रीविषयी ज्ञानेश्वर यांनी सांगितले की, त्यांना कुठला असा दुर्धर आजार नव्हता. मात्र वयोमानानुसार जे आजार आले त्याचा त्यांनी हिंमतीनं सामना केला.

लता दिदींनीही आपल्या व्टिटवरुन पद्मा सचदेव यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी लेखिकेबरोबर एक फोटोही शेयर केला आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, मी आता काय बोलु, माझी प्रिय मैत्रीण आणि लेखिका, कवी आणि संगीतकार पद्मा हिच्या निधनाची बातमी ऐकुन धक्का बसला आहे. आमची खूप जुनी मैत्री होती. आमच्यात एक कौटूंबिक नातंही होतं. लेखिकेनं माझ्या अमेरिकेतील एका कार्यक्रमामध्ये भागही घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com