एमाची बेले फेव्हरेट 

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

"हॅरी पॉटर'मधली हरमायनी ग्रेजर ते "रिग्रेशन'मधली एंजेला ग्रे या सगळ्या भूमिकांना एमा वॉटसनने अतिशय उत्तम न्याय दिलाय. आता तिचा आगामी "ब्युटी ऍण्ड द बिस्ट' हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाच्या आधी तिला 2015 मध्ये आलेल्या "सिंड्रेला' या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं आणि तो चित्रपट तिने नाकारला होता. त्याचं कारण तिनं सांगितलंय. ती म्हणते, "मी जेव्हा तो चित्रपट नाकारला तेव्हा मला माहीत नव्हतं की "ब्युटी ऍण्ड द बिस्ट' हा चित्रपट येत आहे. पण मी या चित्रपटाची कथा वाचली तेव्हा मला या चित्रपटातील बेले सिंड्रेलापेक्षा जास्त भावली.

"हॅरी पॉटर'मधली हरमायनी ग्रेजर ते "रिग्रेशन'मधली एंजेला ग्रे या सगळ्या भूमिकांना एमा वॉटसनने अतिशय उत्तम न्याय दिलाय. आता तिचा आगामी "ब्युटी ऍण्ड द बिस्ट' हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाच्या आधी तिला 2015 मध्ये आलेल्या "सिंड्रेला' या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं आणि तो चित्रपट तिने नाकारला होता. त्याचं कारण तिनं सांगितलंय. ती म्हणते, "मी जेव्हा तो चित्रपट नाकारला तेव्हा मला माहीत नव्हतं की "ब्युटी ऍण्ड द बिस्ट' हा चित्रपट येत आहे. पण मी या चित्रपटाची कथा वाचली तेव्हा मला या चित्रपटातील बेले सिंड्रेलापेक्षा जास्त भावली. आणि माझ्या मते दोन्ही राजकन्यांमध्ये बेले हीच माझ्यासाठी सरस आहे. ती माझ्यासाठी रोल मॉडेल आहे. कारण बेले ही कनवाळू, खुल्या मनाची आहे, तशीच जिज्ञासूही आहे. ती इतरांचं ऐकून स्वतःचं मत बदलत नाही आणि पळही काढत नाही. ती पक्की फेमिनिस्ट आहे. या तिच्या गुणांमुळेच बेलेची भूमिका तिला करावीशी वाटली. तिच्या बोलण्यावरून तिला बेले खूप चांगली समजलीय, हे कळतं. आता मार्चमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट तिच्या फॅन्ससाठी पर्वणीच असेल, यात शंकाच नाही. 
 

Web Title: Emma Watson will play Belle in Disney's live-action remake of Beauty of the Beast

टॅग्स