esakal | Emmy Awards 2021; द क्राऊन, द मंडलोरियनला सर्वाधिक नामांकनं
sakal

बोलून बातमी शोधा

the crown and mandalorian

Emmy Awards 2021; द क्राऊन, द मंडलोरियनला सर्वाधिक नामांकनं

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - दरवर्षी एमी अॅवॉर्डसबद्दल (emmy awards) जाणकार प्रेक्षक, चाहते आणि अभ्यासक यांच्यामध्ये कमालीचे कुतूहल असते. त्यासाठी वेगवेगळे दिग्दर्शक या अॅवॉर्डसचीही ते वाट पाहत असतात. 2021 मध्ये होणाऱ्या एमी अॅवॉर्डची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा अॅवॉर्डस सोहळा हा 73 वा सोहळा आहे. त्याच्या नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली आहे. रॉन सेफन्स जोन्स (ron safens jonnes) आणि जॅस्मिन सेफस जोन्स (jasmin safons jonnes) यांनी घोषणा केली होती. यावर्षी हा सोहळा 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. यंदा एमी अॅवॉर्डस 2021 ची संपूर्ण जबाबदारी कॉमेडियन सेड्रिक द एंटरटेनरनं आपल्या खांद्यावर घेतली आहे.(emmy awards 2021 the crown and mandalorian gets lead in the list see the nominations yst88)

एमी अॅवॉर्डस 2021 च्या मुख्य नॉमिनेशनच्या कॅटगिरीची पूर्ण यादी आता समोर आली आहे. त्यात ज्या मालिकेनं गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रेक्षकांना वेड लावले आहे ती द क्राऊन (the crown) आणि मंडलोरियन (mandalorain) यांचा समावेश आहे. या दोन्ही मालिकांना सर्वाधिक नामांकनं मिळाली आहेत. एकुण 130 नॉमिनेशन्स आहेत. वांडाव्हिजनला 23 नामांकनं मिळाली आहेत. नेटफ्लिक्स या यादीत 129 नामांकन मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. कोणकोणत्या मालिका आणि चित्रपटांना नामांकन मिळाली आहेत ते पाहूयात.

सर्वोत्कृष्ठ ड्रामा सिरिजमध्ये द हँडमेड टेल, द बॉयज, ब्रिजटर्न, द क्राऊन, लव क्राफ्ट कंट्री, द मंडलोरियन, पोज, दिस इज अस, विनोदी पुरस्कारांसाठी ब्लॅक इश, कोब्रा क्वॉय, एमिली इन पॅरिस, हॅक्स, द फ्लाईट अटेंडेंट, द कोमिंस्की मेथड, पेन 15,

हेही वाचा: प्राजक्ता लवकरच उलघडणार 'गुपित'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हेही वाचा: धर्मशाळेतील ढगफुटीत 'सुफी गायक मनमित सिंग' यांचा मृत्यु

ड्रामा सिरिज मुख्य अभिनेत्री नामांकन - उजो अडूबा, उजो अडूबा (इन ट्रीटमेंट), ओलिविया कोलमेन (द क्राउन), एम्मा कॉरिन (द क्राउन), एलिजाबेथ मॉस (द हँडमेड टेल), एमजे रोड्रिगेज (पोज), जेर्नी स्मोलेट (लवक्राफ्ट कंट्री), ड्रामा सीरीज- मुख्य अभिनेतासाठी नामांकन - स्टर्लिंग के. ब्राउन (दिस इज अस), जोनाथन मेजर्स (लवक्राफ्ट कंट्री), जोश ओ'कॉनर (द क्राउन), रेगे-जीन पेज (ब्रिजर्टन), बिली पोर्टर (पोज), मैथ्यू राइस (पेरी मेसन)

loading image