esakal | प्राजक्ता लवकरच उलघडणार 'गुपित'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

prajakta mali

प्राजक्ता लवकरच उलघडणार 'गुपित'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी प्राजक्ता शेअर करत असते. नुकताच प्राजक्ताने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली. या फोटोच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. प्राजक्ताने एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लिहीले आहे, 'प्राजक्ताकडून लवकरच एक सुंदर भेट' त्याला तिने कॅप्शन दिलं, 'माझ्या ह्रदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट माझी गुपितं म्हणा हवं तर... लवकरच खास तुमच्यासाठी' (prajakta mali share post she will revealed her secret)

प्राजक्ताच्या या पोस्टला तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अमृता खनविलकरने देखील प्राजक्ताच्या या पोस्टला कमेंट केली. या पोस्टवरून अनेकांनी असा अंदाज लावला की प्राजक्ता तिच्या आयुष्यातील अनुभवावर पुस्तक लिहीणार आहे. पण याबाबत प्राजक्ताने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

हेही वाचा: ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेचे ५०० भाग पुर्ण

सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोचे प्राजक्ता सुत्रसंचालन करत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमधील प्राजक्ताच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पार्टी, हंपी, डोक्याला शॉट या मराठी चित्रपटांमध्ये प्राजक्ताने महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा: ‘देवमाणूस’मध्ये चंदाला पाहून अजितकुमारची हरपणार शुद्ध

loading image