esakal | धर्मशाळेतील ढगफुटीत 'सुफी गायक मनमित सिंग' यांचा मृत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

manmeet singh

धर्मशाळेतील ढगफुटीत 'सुफी गायक मनमित सिंग' यांचा मृत्यु

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रख्यात सुफी गायक मनमित सिंग (sufi singer manmeet singh) यांच्या मृतदेहाची गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरु होती. त्याचा शोधही घेतला जात होता. अखेर त्यांचा मृतदेह हा कांगडा (kanganda) येथील एका तलावाजवळ आढळून आला आहे. तिथे एका खड्ड्य़ामध्ये हा मृतदेह मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील (himachal pradesh, dharmashala) धर्मशाळा येथे ढगफुटी झाली होती. त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. काही वर्षांपूर्वी उत्तराखंड येथे देखील अशाच प्रकारची ढगफुटीचा प्रकार समोर आला होता. (sufi singer manmeet singh dead body found near kareri lake in kangra district after dharmashala cloud burst)

जेव्हा धर्मशाळा येथे ढगफुटी (cloud burst) झाली तेव्हापासून मनमीत सिंग हे बेपत्ता झाले होते. त्यांच्या मृत्युची बातमी ऐकून घरातले सर्वजण मोठ्या धक्क्यात आहे. त्यांच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. परिवारातील एकानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन याविषयी माहिती दिली आहे. संगीताच्या दूनियेत सेन ब्रदर्स म्हणून जी जोडी होती ती आता तुटल्याचे दिसून आले आहे. मनमीत हे पंजाब मधील अमृतसर येथे राहणार होते. दूनियादारी या गाण्यापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

सोमवारी हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये ढगफुटीचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला. त्यात वित्त, जीवीतहानी झाली आहे. अजून त्याठिकाणी बचावकार्य दलाच्या जवानांचे काम सुरु आहे. मनमीत यांच्या निधनाची बातमी ऐकून अमृतसर मधील छेहर्टा गावात शोककळा पसरली आहे. सुत्रांनी असं सांगितलं आहे की, मनमीत सिंग त्यांचे भाऊ कर्णपाल आणि आणखी मित्रांसमवेत धर्मशाळा येथे गेले होते. रविवारच्या दिवशी ते सर्वजण फिरायला गेले होते. रात्री मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली तेव्हा ते थांबले. सकाळी निघु असा विचार करत असतानाच दुसऱ्या दिवशी एका खड्डयात मनमीत सिंग यांचा मृतदेह आढळला.

हेही वाचा: लिएंडर पेस युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?

हेही वाचा: 'दिवस वाईट,पैसे संपले, घरच्यांनी सोडलं: ज्येष्ठ अभिनेत्रीची खंत

दोन दिवसांपासून त्यांच्या मित्रांनी शोध सुरु केला. मात्र ते काही सापडले नाहीत. करेरी गावात कुठलाही सिग्नल मिळत नसल्यानं कुठलीच माहिती मिळत नव्हती. अखेर त्यांचा मृतदेह एका खड्ड्यात आढळला. बचावकार्यातील जवानांनी रात्री उशिरापर्यत शोध सुरु ठेवल्यानं त्यांना त्यांचा शोध घेता आला.

loading image