esakal | बघा आता, इमरान हाश्मीनं केली 'बॉडी', सलमानला टक्कर
sakal

बोलून बातमी शोधा

emran hashmi

बघा आता, इमरान हाश्मीनं केली 'बॉडी', सलमानला टक्कर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हटके अंदाजासाठी अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा प्रख्य़ात आहे. सिरियल किसर म्हणून त्याची ओळख बॉलीवूडला झाली ती मर्डर या चित्रपटापासून. त्यानंतर तो त्याच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जाऊ लागला. काही कालावधी तो बॉलीवूडपासून लांबही होता. त्याच्या कौटूंबिक कारणामुळे. मुंबई सागा या चित्रपटामधून त्यानं कमबॅक केलं. आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला. सोशल मीडियावर फारसा चर्चेत नसणारा इमरान आता त्याच्या लुकवर बरीच मेहनत घेताना दिसतोय. (emraan hashmi ripped biceps photo viral on social media yst88)

सध्या इमरानचा (Emraan Hashmi) सिक्स पॅकवाला लूक सोशल मीडियावर जाम व्हायरल झाला आहे. त्यात त्याचा हटके लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वन्स अपॉन टाईम इन मुंबई (once uopn tine in mumbai) इमरान जी भूमिका साकारली होती त्यामुळे त्याच्याकडे ताकदीचा अभिनेता म्हणून पाहिलं गेलं. त्या चित्रपटामध्ये त्यानं अजय देवगणला टक्कर दिली होती. अजय बरोबर प्रेक्षकांना इमरान हाश्मीचा तो अभिनय कमालीचा आवडला होता.

हेही वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोशल मीडियावरुन हटवलं पतीचं नाव, झाली ट्रोल

हेही वाचा: चित्रपटप्रेमींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वेबसिरिज,सिनेमांची मेजवानी

इमरानं (Emraan Hashmi) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेयर केला आहे. त्यात तो ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात डंबेल्स आहेत. या फोटोची वेगळी गोष्ट म्हणजे इमरानचे रिप्ड बायसेप्स. त्या फोटोला चाहत्यांनी लाईक्स दिले आहेत. मोठ्या प्रमाणात कमेंट्सही आल्या आहेत. इमराननं शेयर केलेल्या त्या फोटोला कॅप्शनही दिले आहे. त्यात तो म्हणतो, आर्म डे चा पुन्हा एकदा नवीन जोश, इमरान हा टायगर जिंदा है च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. त्यासाठी तो मेहनत घेताना दिसतो आहे. त्यात त्याच्या जोडीला सलमान खान (salman khan), कॅटरिना कैफ (katrina kaif) दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो व्हिलनच्या भूमिकेत आहे.

इमरानच्या (Emraan Hashmi) त्या फोटोवर एका चाहत्यानं कमेंट केली आहे. तो म्हणतो, आम्हाला तुझ्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. सलमानला नव्हे तर तुला पाहण्यासाठी. गेल्या महिन्यात देखील इमराननं असाच एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. त्या फोटोमध्ये त्यानं सिक्स अॅब्स दिसतील अशी पोज दिली होती.

loading image
go to top