esakal | प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोशल मीडियावरुन हटवलं पतीचं नाव, झाली ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

actress samantha

प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोशल मीडियावरुन हटवलं पतीचं नाव, झाली ट्रोल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - केवळ टॉलीवूडमध्येच नाहीतर बॉलीवूडमध्ये (BOLLYWOOD) देखील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडणाऱ्या समंथा अक्किनेनीचं (Samantha Akkineni) द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनपासून कौतूक होतयं. तिनं ज्या पद्धतीनं त्या सीझनमध्ये काम केलं त्यामुळे ती प्रेक्षकांच्या आवडीची अभिनेत्री झालीय. समंथा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सध्या ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं सोशल मीडियाच्या आपल्या अकाउंटमध्ये केलेला बदल. समंथा त्यामुळे ट्रोलही झाली आहे. तिनं नाव बदललं हे एकवेळ ठीक होतं पण त्यातून आपल्या पतीच्या नावाचा उल्लेखही तिनं टाळल्यानं चर्चेत आली आहे. (samantha akkineni changed her name on twitter and insta handle removed husband chaitanya surname yst88)

समंथा सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करत असते. त्याला चाहत्यांचा मोठया प्रमाणावर प्रतिसादही मिळतो. तिनं आपल्या इंस्टाचं प्रोफाईल नेम चेंज केलं आहे. व्टिटरचंही नाव तिनं बदललं आहे. तिच्या चाहत्यांना ही गोष्ट खटकली. यावरुन तिला अनेकांनी ट्रोलही केले आहे. हे सगळं करण्यामागचे काय कारण, असा प्रश्नही तिला विचारला आहे. समंथा अक्किनेनी हे नाव हटवत तिनं केवळ एस हे अक्षर ठेवल्याचे दिसुन आले आहे. तिच्या फेसबूक पेजवर तर अजून कुठला बदल दिसून आला नाही. मात्र यासगळ्यात तिनं हा बदल का केला याचे कारण स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा: आमिरच्या मुलीचा फोटो, नेटकरी म्हणाले 'हा तर छोटा आमिर'

हेही वाचा: चित्रपटप्रेमींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वेबसिरिज,सिनेमांची मेजवानी

ट्रोलर्सला यानिमित्तानं तिला ट्रोल करण्याचा बहाणा मिळाला आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाजही व्यक्त केले आहे. काहींचं म्हणणं आहे की, तिची पतीबरोबर भांडणं झाली असतील त्यामुळे तिनं अशाप्रकारचा बदल केला असेल. अनेकांना यावर समंथाचे काय म्हणणे आहे हे जाणून घ्यायचे आहे.

समंथा ही मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या भागात दिसली होती. या मालिकेनं भारतीय वेबसीरिजच्या विश्वात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे. त्यात समंथाच्या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात कौतूकही झालं. तिनं अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. जाणकार प्रेक्षक, समीक्षक यांनीही समंथाला पसंती दिली. त्यानंतर ती एक स्टार सेलिब्रेटी झाली आहे. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच ‘काथू वाकुला रेंडू काधल' नावाच्या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. त्यात तिच्या जोडीला विजय सेतुपती असणार आहे.

loading image
go to top